PM Modi Get Emotional About His Mother's 100th Birthday Twitter/@narendramodi
देश विदेश

PM Modi : "माझी आई दुसऱ्यांच्या घरची भांडी धुवायची"; पंतप्रधानांची आईबाबत भावुक पोस्ट

PM Modi Mothers Birthday : नरेंद्र मोदी या वेबसाईटवर आपल्या ब्लॉगमध्ये पंतप्रधानांनी आपल्या आईविषयी अनेक आठवणी सांगितल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचा आज वाढदिवस आहे. हिराबेन आज आपल्या आयुष्याच्या १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्तानं पंतप्रधान मोदी हे सुद्धा आई हिराबेन यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गुजरातमध्ये (Gujarat) पोहचले. गुजरातमधील गांधीनगर येथे भावाच्या घरी जात मोदींनी हिराबेन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या इतकंच नाही, तर मोदींनी हिराबेन यांचे पाय धुतले आणि त्यांनी एक खास गिफ्टही दिलं. आपल्या आईच्या १०० व्या वाढदिवशी पंतप्रधान भावूक झाले. आपल्या बालपणी आपली आई दुसऱ्याच्या घरी धुनी-भांडी करायची आणि इतक्या कष्टातून आईने मला मोठं केलं असं सांगताना मोदी भारावून गेले. नरेंद्र मोदी या वेबसाईटवर आपल्या ब्लॉगमध्ये पंतप्रधानांनी आपल्या आईविषयी अनेक आठवणी सांगितल्या आहेत. (PM Narendra Modi Mother Birthday Latest News)

हे देखील पाहा -

आपल्या ब्लॉगमध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. मोदी म्हणतात की, "आई हा एक शब्द नाही. स्नेह, धैर्य, विश्वास अशा सगळ्या भावनांचं प्रतीक म्हणजे आई. आज मी आनंदाची बातमी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो. माझी आई, हीराबा आज 18 जून रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे".आज माझ्या आयुष्यात जे काही चांगलं आहे, माझ्या व्यक्तिमत्वात जे काही चांगलं आहे ते आईवडिलांचं आहे. आज मी दिल्लीत बसून हे लिहित असताना अनेक आठवणी दाटल्या आहेत".

पंतप्रधान लिहितात, "आईचा जन्म मेहसाणा जिल्ह्यातल्या विसनगर इथे झाला. वडनगरपासून हे गाव जवळ आहे. हीराबेन यांच्या जन्मानंतर काही दिवसातच त्यांच्या आईचं निधन झालं. शतकापूर्वी आलेल्या साथीच्या रोगामध्ये आजी गेली. माझ्या आईचं बालपण आईविना गेलं. तिला लहानपण मिळालंच नाही. आईचं शिक्षणही झालं नाही. आईने शाळेचं तोंड देखील पाहिलेलं नाही. आईने पाहिली ती फक्त गरिबी आणि घरात प्रत्येक गोष्टीचा अभाव". आई भावंडांमध्ये सगळ्यात मोठी. तिचं लग्न झालं तेव्हा सासरी सगळ्यात मोठी सून झाली असं पंतप्रधान लिहितात.

आईने केलेल्या संघर्षाविषयी पंतप्रधान लिहितात, "घर चालवण्यासाठी चार पैसे जास्त मिळावेत याकरता आई अन्य लोकांच्या घरी धुण्याभांड्याचं काम करत असे. वेळ काढून चरखाही चालवत असे. कारण त्यातून थोडे पैसे मिळत. कापूस पिंजत असे. सूत कातत असे. हे सगळं आई करत असे. आम्हाला कापसाचे काटे टोचणार नाहीत ना याची तिला काळजी असे". आईला घर सजवण्याची, घराची शोभा वाढवण्याची खूप आवड होती. घर सुंदर, स्वच्छ दिसण्यासाठी ती दिवसभर काम करायची. ती घराच्या आतील जमीन शेणाने ओतत असे. तुम्हाला माहित असेल की शेणाच्या पोळीला आग लावली तर कधी कधी सुरवातीला खूप धूर निघतो. खिडकी नसलेल्या त्या घरात आई शेणावरच अन्न शिजवायची. धूर निघू शकला नाही, त्यामुळे घराच्या आतील भिंती लवकर काळ्या पडायच्या. दर काही आठवड्यांनी आई त्या भिंतीही रंगवायची. त्यामुळे घरात नवचैतन्य आले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असतानाच भारतीय खेळाडूची निवृत्ती, १७ वर्षाच्या करिअरचा शेवट

Maharashtra Live News Update : - नुकसानग्रस्त कुटुंबीयांसमवेत अंबादास दानवेंनी साजरी केली दिवाळी

Sangli Water Supply : ऐन दिवाळीत सांगली शहरात पाण्याचा ठणठणाट; संतप्त नगरसेवकांनी पाणीपुरवठा कार्यालयासमोर धरणे

Rohit Pawar : दोन्ही पक्षातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

मातोश्रीत भाजपच्या माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; नरकासुराचा वध करण्यासाठी आला-उद्धव ठाकरे|VIDEO

SCROLL FOR NEXT