School shooting Video saam tv
देश विदेश

School shooting Video: शाळेत २ बंदुका घेऊन घुसला विद्यार्थी; दिसेल त्याच्यावर झाडल्या गोळ्या, २ जणांचा मृत्यू

Philippines School: फिलिपिन्सच्या झाम्बोआंगा शहरातील शाळेत विद्यार्थ्याने दोन बंदुका घेऊन गोळीबार केला. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. हल्ल्यानंतर विद्यार्थ्याने स्वतःवर गोळी झाडली. घटनेनंतर शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

फिलिपिन्सच्या दक्षिण भागातील झाम्बोआंगा शहरात मंगळवारी एका शाळेत गोळीबाराची घटना घडली. एका हायस्कूलच्या विद्यार्थ्याने दोन बंदुका घेऊन शाळेत गोळीबार केला. या हल्ल्यात त्याच्याच वर्गातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर विद्यार्थ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

लाईव्ह स्ट्रिमींग करत केला हल्ला

झाम्बोआंगा शहराचे महापौर काइमर अदन ओलासो यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने अंगावर बॉडी कॅमेरा लावला असावा आणि तो हल्ल्याचं लाईव्ह स्ट्रिमींग करत असल्याचं दिसून आलं. ही घटना अ‍ॅटेनियो डी झाम्बोआंगा युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधील हायस्कूलमध्ये घडली. या घटनेत आणखी दोन जण जखमी झाल्याची माहिती वृत्तसंस्था एपीने दिलीये.

हल्लेखोराने सुरुवातीला एका शिक्षकावर गोळीबार केला. मात्र त्या गोळीबारात शिक्षकाला गोळी लागली की नाही हे लगेच स्पष्ट झालं नाही. त्यानंतर त्याने एका विद्यार्थ्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून स्वतःचं जीवन संपवलं.

अ‍ॅटेनियो डी झाम्बोआंगा युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष अर्नाल्ड अँडाल यांनी आता शाळेत गोळीबाराचा कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केलंय. तसंच यापुढे कोणाचाही मृत्यू किंवा जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नसल्याचे त्यांनी सांगितलं. विद्यापीठ प्रशासन पोलीस आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून पुढील माहिती मिळताच ती जाहीर केली जाणार आहे.

“अशा घटना घडू नयेत, अशीच आमची इच्छा आहे. आमच्या सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची सर्वात मोठी प्राथमिकता आहे.” असं अर्नाल्ड अँडाल यांनी सांगितलंय. रॉयटर्सने त्यांच्या वक्तव्याचा हवाला दिलाय.

शाळेतील गोळीबाराची दुसरी घटना

फिलिपिन्समध्ये शाळेतील गोळीबाराची ही घटना अशा प्रकारची अलीकडील दुसरी मोठी घटना आहे. जूनमध्ये टॅक्लोबान शहरातील एका सरकारी हायस्कूलमध्ये दोन विद्यार्थ्यांनी गोळीबार केला होता. त्या घटनेत किमान तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे 20 जण जखमी झाले होते.

दरम्यान, या घटनेच्या अवघ्या दहा दिवसांपूर्वी थायलंडमध्येही शाळेत गोळीबाराची गंभीर घटना घडली होती. बँकॉकच्या बाहेरील भागातील एका शाळेत एका विद्यार्थ्याने गोळीबार करत धुमाकूळ घातला होता. त्यामुळे फिलिपिन्समधील ताज्या घटनेने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT