A powerful 6.7 magnitude earthquake struck Mindanao in southern Philippines saam tv
देश विदेश

व्हेनेझुएलातील विध्वंसानंतर दुसऱ्याच दिवशी फिलिपिन्समध्ये ६.७ तीव्रतेचा भूकंप

Philippines Earthquake: दक्षिण फिलीपिन्समध्ये ६.७ तीव्रतेचा भूकंप झाला. लाखो लोकांना याचे धक्के जाणवले, तर प्रशासनाने स्पष्ट केले की त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

Bharat Jadhav

  • दक्षिण फिलिपिन्समधील मिंडानाओ येथे ६.७ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला.

  • यूएसजीएसनुसार भूकंपाचे केंद्र ४१.४ किमी खोलीवर होते.

  • अधिकाऱ्यांनी त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.

व्हेनेझुएलातील भूकंपानंतर आता फिलिपिन्समध्ये भूकंपाचे झटके जाणवले आहेत. दक्षिण फिलिपिन्स भागात आलेल्या या भूकंपाची तीव्रता ६.७ एवढी होती. या भूकंपाचे केंद्र फिलिपिन्सच्या मिंडानाओमध्ये ४१.४ किमी खोलीवर होतं. याबाबतची माहिती यूनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हेने यासंदर्भात माहिती दिली आहे. या भूकंपाचे हादरे ६४ लाख लोकांना बसले, यांपैकी अंदाजे १ लाख ६८ हजारांहून अधिक लोक भूकंपामुळे अत्यंत प्रभावित झालेल्या भागात होते. महत्वाचे म्हणजे, अद्याप त्सुनामीच्या धोक्याची कसलीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वे'ने (USGS) दिलेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएलातील जबरदस्त भूकंपात शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, या घटनेच्या अगदी एक दिवसानंतरच शुक्रवारी दक्षिणी फिलीपींसजवळ ६.७ एवढ्या तीव्रतेचा भूकंप आला. 'फिलिपिन इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनॉलॉजी अँड सिस्मॉलॉजी'ने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ७:३४ वाजता बलुत बेट, सारंगानी, दावओ ऑक्सिडेंटलच्या किनारपट्टीवर ६.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे.

या भूकंपाचे हादरे क्विंबा, सारंगानी, डॉन मार्सेलिनो, सांता मारिया, दावो ऑक्सीडेंटल, मतानाओ, दावो डेल सुर, डिगोस सिटी, दावो डेल सुर, मोंकायो, मावाब आणि मारागुसान, दावो येथे जाणवले. येथे मोठ्या नुकसानाची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर भूकंपाचे व्हिडिओ व्हायरल झाले असून यात इमारती कोसळताना आणि लोकांची धावपळ उडालेलीही दिसत आहे. अद्याप जीवितहानीची नेमकी आकडेवारी समोर आलेली नाही.

40 सेकंदात अख्खं शहर जमीनदोस्त

दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला शतकातील दोन सर्वात भीषण भूकंपांनी हादरून गेलंय. ७.१ आणि ७.५ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाच्या धक्क्यांनी कराकस शहरातील इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. तर अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, या नैसर्गिक आपत्तीत तब्बल १० हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. भूकंपाचे केंद्र व्हेनेझुएलाच्या उत्तरेकडील भागात असल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

Congress Reshuffle : काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ; ३ राज्यांच्या संघटनेत अचानक केले बदल, संजय दत्त यांच्याकडे मोठी जबाबदारी

खासगी रुग्णालयांमधील लुटीला चाप बसणार, खासगी रुग्णालयांना आता रेट कार्ड बंधनकारक, आरोग्यमंत्र्यांची घोषणा, 'साम'चा रियालिटी चेक

फुटीर खासदारांच्या दारात उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरेंचं मिशन मराठवाडा, फुटीरांना सक्षम पर्याय देण्यात यश मिळणार?

रामलल्लाच्या दानपेटीवर 1400 कोटींचा डल्ला? छुपा कॅमेऱ्यानं फोडलं चोरांचं बिंग

SCROLL FOR NEXT