Maharashtra Farmer Loan Waiver: मोठी बातमी! ६ लाख शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, कर्जमाफीचा पहिला हप्ता खात्यात जमा

Farmer Loan Waiver Good News: राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी एका क्लिकद्वारे ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार कोटी रुपये वितरीत केले.
Maharashtra Farmer Loan Waiver: मोठी बातमी! ६ लाख शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, कर्जमाफीचा पहिला हप्ता खात्यात जमा
Maharashtra Farmer Loan Waivermeta ai
Published On
  • कर्जमाफीचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

  • ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वितरीत

  • मुख्यमंत्र्यांनी एका क्लिकद्वारे पैसे केले वितरीत

  • शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ हजार कोटी रुपये जमा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्जमाफीचे पैसे कधी मिळणार याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली. कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे. आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे रक्कम हस्तांतरीत केली. राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार कोटी रुपये जमा झालेत.

आज राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला. ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ५०२९ कोटी रुपये ट्रान्स्फर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे रक्कम हस्तांतरित केली. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर रक्कम थेट जमा करण्यात आली.

Maharashtra Farmer Loan Waiver: मोठी बातमी! ६ लाख शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, कर्जमाफीचा पहिला हप्ता खात्यात जमा
Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होणार ७ हजार कोटी रुपये, तारीख आली समोर

राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक बळ मिळेल. पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांवरही लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित करण्यात येणार आहे.

Maharashtra Farmer Loan Waiver: मोठी बातमी! ६ लाख शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, कर्जमाफीचा पहिला हप्ता खात्यात जमा
Farmer Loan Waiver : 'या' ३०,५५५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही; कारण आलं समोर

मुख्यमंत्र्यांनी याबाबत सांगितले की, 'जवळपास ५ हजार २९ कोटींचा पहिला हप्ता जमा झाला आहे. ६.२२ लाख शेतकऱ्यांची खाती आज नील करण्यात आली. कर्जाचे पैसे अकाऊंटमधले आणि शासनाने भरलेले पैसे हे सारखे असल्यामुळे ते नील झाले आहे. जसेजसे अकाऊंट नील होतील तसे तसे पैसे खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होतील.'

Maharashtra Farmer Loan Waiver: मोठी बातमी! ६ लाख शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, कर्जमाफीचा पहिला हप्ता खात्यात जमा
Maharashtra Farm Loan Waiver 2026: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे काम पूर्ण केले नाही तर कर्जमाफी मिळणार नाही

तसंच, 'शेतकऱ्यांना फक्त आधार ऑथेंटिकेशन करायचे आहे. हे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. १२ लाख खाती सुधारणेसाठी बँकांना परत पाठवली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचे पैसे आणि दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहन पैसे दिले जाणार आहेत. ओटीएस नाही त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांवर सिबीलची अट घाालण्यात आली नाही. अकाऊंट जसे येतील तसे पैसे जमा होतील.', असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com