Urine infection: रात्री वारंवार लघवीला जावे लागतेय? 'ही' ३ लक्षणे दिसताच त्वरित सावध व्हा, अन्यथा...

Surabhi Jayashree Jagdish

युरिन इन्फेक्शन

युरिन इन्फेक्शन म्हणजे मूत्रमार्गात बॅक्टेरियाचा संसर्ग होतो. हा संसर्ग मूत्रमार्ग, मूत्राशय किंवा काही गंभीर प्रकरणांमध्ये किडनीपर्यंतही पोहोचू शकतो. योग्य वेळी उपचार घेतल्यास हा संसर्ग नियंत्रणात येऊ शकतो.

Urinary tract infection | saam tv

का होतं इन्फेक्शन?

बहुतेक वेळा बॅक्टेरिया मूत्रमार्गात प्रवेश केल्यामुळे हा संसर्ग होतो. कमी पाणी पिणं, लघवी जास्त वेळ रोखून ठेवणं आणि वैयक्तिक स्वच्छतेची कमतरता यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. महिलांमध्ये मूत्रमार्ग लहान असल्यामुळे त्यांना UTI होण्याची शक्यता अधिक असते.

Frequent urination | saam tv

काय काळजी घ्यावी?

दिवसभर पुरेसं पाणी पिणं आणि लघवी जास्त वेळ रोखून न ठेवणं आवश्यक आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधं पूर्ण कोर्सपर्यंत नियमित घ्यावीत. कोणतीही औषध स्वतःहून सुरू किंवा बंद करू नये.

Burning urination | saam tv

त्रास कमी करण्यासाठी काय करावं?

झोपण्यापूर्वी लघवी करून झोपल्यास रात्री वारंवार उठण्याचा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो. वेदना कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने गरम पाण्याची पिशवी किंवा हीटिंग पॅड वापरता येऊ शकतो.

Bladder infection | saam tv

रात्री वारंवार लघवीसाठी जाग येणं

युरिन इन्फेक्शनमुळे रात्री अनेक वेळा लघवीची तीव्र इच्छा होऊ शकते. त्यामुळे वारंवार झोपेतून उठावं लागतं आणि सलग झोप पूर्ण होत नाही. हा त्रास सातत्याने होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Kidney infection | saam tv

झोप न लागणं

रात्री लघवीची तीव्र इच्छा, जळजळ किंवा वेदनांमुळे शांत झोप घेणं कठीण होऊ शकतं. वारंवार झोप मोडल्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा आणि अस्वस्थता जाणवतो. अशी समस्या वारंवार होत असल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

Sleep disruption | saam tv

अंथरूण ओलं होणं

काही रुग्णांमध्ये युरिन इन्फेक्शनमुळे रात्री लघवीवर नियंत्रण कमी होऊ शकतं. त्यामुळे झोपेत नकळत लघवी लीक होण्याची किंवा अंथरूण ओलं होण्याची शक्यता असते. अशी लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार सुरू करावेत.

Healthy bladder | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Personal hygiene | saam tv

Milk: दूध प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का?

HDL cholesterol | saam tv
येथे क्लिक करा