PFI Plans To Make India A Muslim Nation
PFI Plans To Make India A Muslim Nation Saam TV
देश विदेश

भारताला २५ वर्षांत मुस्लिम राष्ट्र करण्याचा PFI चा डाव; धक्कादायक माहिती उघड

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : पुढील २५ वर्षात हिंसाचार पसरवून भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा PFI चा डाव आहे, अशी खळबळजनक माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाल्याचं समोर आलंय. यासाठी आखाती देशातून पीएफआयला मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फंड देखील मिळत होता. याची माहिती ईडीला मिळाली होती. या फंडाच्या माध्यमातून पीएफआय दंगली घडवण्याच्या तयारीत होती. २०४७ पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा डाव होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी देशातील वेगवेगळ्या राज्यात छापेमारी केली. या कारवाईत दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) १०० सदस्यांना ताब्यात घेतलं. देशभरातील १० राज्यांत एनआयए आणि ईडीने संयुक्तरित्या ही छापेमारी केली.

एनआयएने आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि अन्य काही राज्यात छापेमारी केली. दहशतवाद्यांना निधी पुरवणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, बंदी घातलेल्या संघटनांमध्ये नागरिकांना जाण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि बेकायदेशीर कृत्य करणे या आरोपांखाली पीएफआयच्या १०० सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं.

दरम्यान, २०४७ पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा पीएफआयचा डाव होता. यासाठी त्यांना आखाती देशातून मोठ्या प्रमाणात फंड मिळत होता. या फंडाच्या माध्यमातून पीएफआय दक्षिण आणि उत्तर भारतात दंगली घडवणं. तसंच राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये हत्या करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होती. अशी खळबजनक माहिती समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

SCROLL FOR NEXT