Fresh Oil Discovery in Krishna Godavari Basin Saam Tv
देश विदेश

India Oil Production: खुशखबर! देशात पेट्रोलच्या किंमती होणार कमी? कृष्णा गोदावरी खोऱ्यात सापडला तेलाचा साठा

Fresh Oil Discovery in India: देशात नवीन तेलसाटा सापडला आहे. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी माहिती दिली आहे.

Satish Kengar

Fresh Oil Discovery in Krishna Godavari Basin:

देशात नवीन तेलसाटा सापडला आहे. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी माहिती दिली आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले आहेत की, "काकीनाडा किनार्‍यापासून 30 किमी अंतरावर असलेल्या कृष्णा गोदावरी खोऱ्यात काल पहिल्यांदा तेल काढण्यात आले. यावर काम 2016-17 मध्ये सुरू झाले होते. मात्र कोविडमुळे थोडा विलंब झाला," असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

हरदीप सिंग पुरी म्हणाले, “आमच्याकडे फार कमी वेळात गॅसही उपलब्ध होणार आहे. तसेच मे आणि जूनपर्यंत, आपण दररोज 45,000 बॅरल उत्पादन करू शकू, अशी अपेक्षा आहे. हे उत्पादन आपल्या देशाच्या एकूण कच्च्या तेलाच्या उत्पादनाच्या 7 टक्के आणि वायू उत्पादनाच्या 7 टक्के असेल."  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी ओएनजीसीने (ONGC) बंगालच्या उपसागरातील कृष्णा गोदावरी खोऱ्यात केजी-डीडब्ल्यूएन-98/2 ब्लॉक मधून पहिले तेल उत्पादन सुरू केले आहे. ज्या ठिकाणी तेल काढले जात आहे, ते ठिकाण कृष्णा गोदावरी खोऱ्यातील काकीनाडाच्या किनाऱ्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. (Latest Marathi News)

याचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक पोस्ट शेअर केली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी एक्स पोस्टवर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले; “भारताच्या उर्जा प्रवासातील ही अत्यंत उल्लेखनीय पायरी आहे आणि यातून आत्मनिर्भर भारत उभारणीच्या आमच्या अभियानाला मोठी चालना मिळाली आहे. या उपक्रमामुळे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी देखील बरेच लाभ होणार आहेत.”

दरम्यान, जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आणि ग्राहक असलेला भारत देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी जागतिक बाजारपेठेतील विविध स्त्रोतांकडून आयात केलेल्या कच्च्या तेलावर अवलंबून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT