Petrol Diesel Prices
Petrol Diesel Prices Saam Tv
देश विदेश

पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? टाकी फुल्ल करण्यापूर्वी एकदा दर तपासा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, 21 मे रोजी केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ही कपात झाली आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारने तेलावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटही कमी केला.

भारतीय तेल कंपन्यांनी आजचे नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. कंपन्यांनी इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. गेल्या आठवड्यात सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

हे देखील पाहा -

आजचे नवीन दर जाणून घ्या

- दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

- मुंबईमध्ये पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल रु. 97.28 रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लीटर

- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

- तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.58 रुपये प्रति लिटर

- पटनामध्ये पेट्रोल107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

- गुरुग्राममध्ये पेट्रोल 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 109.62 रुपये

दररोज संध्याकाळी 6 वाजता नवीन दर जारी केले जातात

सरकारी तेल कंपन्या रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करतात. त्यानंतरच पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर सकाळी 6 वाजता जाहीर होतात. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पेट्रोल आणि डिझेलची नवीनतम किंमत एसएमएसद्वारे पाहू शकता. तुम्ही SMS द्वारे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाणून घेऊ शकता. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HP Price पाठवून पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाणून घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol Levels : हाय कोलेस्ट्रॉलमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक;आजपासूनच आहारात या पदार्थांचा समावेश करा

Akola Fire News : कचरा जाळल्याने चारचाकी गाड्यांना आग; दोन गाड्यांचे मोठे नुकसान

Gurucharan Singh : गुरूचरण सिंह बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवशी कुठे होता? वडिलांनी सांगितली सर्व घटना

Facial केल्यानंतरही चेहरा काळपट दिसतोय ?Glow टिकवण्यासाठी 'या' काळजी घ्या

Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करा, कार्ला मळवली ग्रामस्थ आक्रमक

SCROLL FOR NEXT