Petrol Diesel Price SaamTV
देश विदेश

Petrol Diesel : कच्च्या तेलाच्या दरात कोणताही बदल नाही, पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - गेल्या 24 तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मंगळवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर जाहीर केले आहे. नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद आणि गुरुग्राममध्ये आज इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. (Petrol Diesel Latest News)

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोल 32 पैशांनी महाग होऊन 96.92 रुपये प्रति लिटरवर पोहोचले, तर डिझेल 31 पैशांनी वाढून 90.08 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. गाझियाबादमध्येही पेट्रोल 32 पैशांनी वाढून 96.58 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 30 पैशांनी महागले असून ते 89.75 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे.

याशिवाय फरिदाबादमध्ये पेट्रोल 27 पैशांनी वाढून 97.49 रुपये आणि डिझेल 26 पैशांनी वाढून 90.35 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. गुरुग्राममध्येही पेट्रोल 7 पैशांनी महाग होऊन 97.04 रुपयांवर पोहोचले आहे, तर डिझेल 7 पैशांनी वाढले असून ते 89.91 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT