Gram Panchayat Election : गावगाड्यावर कुणाची सत्ता, कोण होणार पायउतार? ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल

राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचा (Gram Panchayat) निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात होईल.
Gram Panchayat Election Result 2022
Gram Panchayat Election Result 2022 Saam Tv
Published On

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचा (Gram Panchayat) निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत मतदार राजा कुणाच्या हाती सत्ता देणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मतमोजणीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. (Maharashtra Political News)

Gram Panchayat Election Result 2022
Maharashtra Politics : "...तर हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही; CM शिंदेही आमदार म्हणून अपात्र ठरतील"

मागील काही दिवसांपासून प्रचाराच्या रणधुमाळीत ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापले होते. निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी दिग्गजांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवून प्रत्येक पक्ष हा कसोशीने प्रयत्न करत असल्याचं या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं.

सरपंचाची निवड जनतेतून

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा थेट सरपंचाची निवड हा नियम लागू केला. ज्यामुळे सदस्य निवडीसोबतच सरपंच देखील आता थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता आली नाही तरी चालेल, पण सरपंच आपलाच असावा, असा प्रयत्न अनेकांचा आहे. (Latest Marathi News)

Gram Panchayat Election Result 2022
Rashichakra : ‘या’ राशींच्या लोकांची आर्थिक चिंता दूर होईल; वाचा आजचे राशीभविष्य

निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या

अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी हजारो पोलिस कर्मचारी गावागावामध्ये तैनात असतील. तर संवेदनशील असलेल्या गावांमध्ये अधिकचा फौजफाटा देण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com