Petrol Diesel Price Today Saam TV
देश विदेश

Petrol Diesel: कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार सुरूच, पेट्रोल-डिझेलच्या दरावर काय होणार परिणाम?

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घ्या

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. सुमारे अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वेळी केंद्रातील मोदी सरकारने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

महाराष्ट्रात व्हॅट कपातीची घोषणा

नुकतीच महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली होती, त्यानंतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 5 रुपयांनी आणि डिझेलवर 3 रुपयांनी कपात केली.

हे देखील पाहा -

आजचे भाव काय आहेत?

– पोर्टब्‍लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईमध्ये पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

– जयपुरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 आणि डिझेल डीजल 96.52 रुपये प्रति लिटर

– पटनामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

– बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

– चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दररोज बदलतात. हे बदललेले दर रोज सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात.तुम्हाला जर हे रोजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहायचे असतील तर खालीलप्रमाणे जाणून घेऊ शकता.

-SMS द्वारे पेट्रोल-डिझेलचे रोजचे नवीन दर देखील जाणून घेऊ शकता. यासीठ इंडियन ऑइलचे ग्राहक RSP 9224992249 या नंबरवर आणि BPSL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP पाठवून दराबाबतची माहिती मिळवू शकतात. तर, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPP price किंमत जाणून घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची डेडलाइन वाढली; रजिस्ट्रेशन कसं कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

नवऱ्याची क्रूरता... बेदम मारहाण करत बायकोच्या गुप्तांगामध्ये घातले 10 इंच ब्लेड

Saturn transit: त्रिग्रही योगात शनीचं गोचर; पुढचे 6 महिने 3 राशी कमावणार बक्कळ पैसा

Paneer Tikka Masala Recipe: घरी अचानक पाहुणे आलेत? जेवणासाठी टेस्टी करायचं आहे? मग झटपट बनवा पनीर टिक्का मसाला

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवडमध्ये आज अचानक इंधनाचा तुटवडा, जवळपास 80% पेट्रोल पंप बंद

SCROLL FOR NEXT