Petrol Diesel Price  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; 'या' राज्यात इंधन स्वस्त

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Shivani Tichkule

Petrol Diesel Rate : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम देशांतर्गत रकोळ बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरही दिसून येत आहे. ब्रेंट क्रूड सध्या जागतिक बाजारात 85 डॉलरच्या आसपास आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या इंधनाच्या किरकोळ किमतीतही अनेक ठिकाणी बदल दिसून येत आहेत. (Latest Marathi News)

गौतम बुद्ध नगर (नोएडा) मध्ये पेट्रोल (Petrol) 18 पैशांनी महागले असून ते 96.94 रुपये, तर डिझेल (Diesel) 18 पैशांनी वाढून 90.11 रुपये प्रति लिटर झाले आहे. गाझियाबादमध्ये आज पेट्रोल 14 पैशांनी स्वस्त झाले आहे आणि ते 96.44 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे, तर डिझेल 13 पैशांनी घसरले आहे असून ते 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT