Mumbai Crime News : घरासमोर उभ्या केलेल्या बुलेट बाईकची चोरी, गाड्यांची निगा राखणाराच निघाला चोर

Mumbai News : पुनेश वेला कोळी (24) आणि संजय शिवभाई कोळी (22) अस अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
Mumbai News
Mumbai NewsSaam TV
Published On

संजय गडदे

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात दुचाकी वाहन चोरीचा प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबईच्या एमएचबी कॉलनी पोलिसांनी दोन बाईक चोरांना गुजरातमधून अटक केली आहे.

या दोघांनी बोरिवली आणि सांताक्रुझ परिसरातून रॉयल एनफिल्ड बुलेट चोरी केल्या होत्या. हे दोघेही आरोपी बोरिवली परिसरात बाईक मेकॅनिक म्हणून काम करत होते. पुनेश वेला कोळी (24) आणि संजय शिवभाई कोळी (22) अस अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते दोघेही गुजरातचे रहिवासी आहेत. (Crime News)

Mumbai News
Saamana Editorial News: सुडाच्या राजकारणात रमलेल्यांना शेतकऱ्यांचे दुःख समजून घेण्यासाठी वेळ नाही; सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली परिसरात राहणारे राज मनीष भट्ट गाणे आपली रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट दिल्या राहत्या घरासमोर केली होती. मात्र कोणीतरी चोरून नेल्यामुळे या संदर्भात त्यांनी बोरवली एम एस बी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली यानुसार पोलिसांनी 379 भादविनुसार चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला.  (Latest Marathi News)

गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबले यांनी त्यांच्या पथकासह या प्रकरणाचा तपास सुरू केला. आसपासचे सीसीटीव्ही तपासले असता बुलेट बाईक चोरीला गेल्याचे दिसले. या सीसीटीव्हीवरून पोलिसांनी आरोपींचे फोटो काढून परिसरातील नागरिकांना दाखवले असता यातील एका आरोपीला नागरिकांनी ओळखले होतो. बोरिवली परिसरातच मेकॅनिक म्हणून काम करत असल्याचे सांगितले. पोलिसांनी नागरिकांकडून त्याचा मोबाईल नंबर घेऊन कॉल केला. लोकेशन ट्रेस केले असता आरोपी गुजरातमध्ये असल्याचे निष्पन्न झाले.

Mumbai News
Theft Video : बियर घेण्यासाठी आला, पैसे दिले अन् मोबाईल घेवून पसार झाला, पाहा चोरीचा CCTV व्हिडिओ

पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बॉम्बे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून गुजरातमधील बहादूरगड कच्छ येथून एका आरोपीला बुलेटसह रंगेहात अटक केली. तपासात दुसऱ्या साथीदाराला बुलेट बाईक उडवताना अटक करण्यात आली. दुसऱ्या आरोपीकडून जप्त केलेली बुलेट बाईक सांताक्रूझ पोलिस ठाण्यातून चोरीला गेली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com