Congress Leader Shakeel Ahmad Khan With Son Saam Tv
देश विदेश

Patna News : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या १८ वर्षीय मुलाची आत्महत्या, नेमकं कारण काय?

Congress Leader Shakeel Ahmad Khan With Son: शकील अहमद खान यांच्या १८ वर्षांचा मुलगा अयानने आत्महत्या केली. राहत्या घरी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Priya More

काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि आमदार यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारचे आमदार शकील अहमद खान यांचा मुलगा अयानने पाटणा येथील सरकारी निवासस्थानी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अयानच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलिस सध्या तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शकील अहमद खान यांच्या १८ वर्षांचा मुलगा अयानने आत्महत्या केली. राहत्या घरी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. एफएसएल टीम शकील अहमद खान यांच्या सरकारी निवासस्थानी पोहोचली आहे. अयानचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अलीकडेच राहुल गांधींच्या बिहार दौऱ्यावर शकील अहमद यांनी त्यांच्या मुलाची राहुल गांधींसोबत स्टेजवर ओळख करून दिली होती. अयानने राहुल गांधींना काही कागदपत्रे दिली होती. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू असून पोलिस घटनेची कारणं शोधत आहेत.

काँग्रेस आमदाराच्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, 'एक अत्यंत दु:खद बातमीने मी दु:खी झालो आहे. बिहारमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माझे मित्र डॉ. शकील अहमद खानसाहेब यांच्या एकुलत्या एक मुलाचे अकाली निधन झाले! शकील भाई आणि त्यांच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत.'

शकील अहमद खान यांना मुलगी देखील आहे. ती इंग्लंडमध्ये लॉचे शिक्षण घेत आहे. शकील अहमद खान सध्या बिहारमध्ये नाहीत. अयान रविवारी रात्री जेवल्यानंतर झोपायला आपल्या खोलीमध्ये गेला. सकाळी तो गळफास घेतलेल्या अवस्थेत खोलीमध्ये दिसून आला. त्यामुळे खळबळ उडाली.

शकील अहमद खान यांनी १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी जेएनयू, दिल्ली येथून एमए, एम.फिल आणि पीएचडी पदव्या मिळवल्या आहेत. शकील हे १९९१-१९९२ मध्ये जेएनयूएसयूचे उपाध्यक्ष आणि १९९२-१९९३ मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे अध्यक्ष होते. २००५ मध्ये त्यांची यूपीए सरकारने एनवायकेएसचे महासंचालक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी नेहरू युवा केंद्र संघटनेचे (NYKS) उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT