Amashya Padvi : ठेकेदार- इंजिनीयर यांच्यात पार्टनरशिप असल्याने रस्त्यांची दुर्दशा; आमदार आमश्या पाडवी यांचा गंभीर आरोप

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्ग भागात पहिल्यांदाच आमदार आमश्या पाडवी पोहोचले. १५ किलोमीटरची पायपीट करत आमदार पाडवी दुर्गम भागात पोहोचले कामाची पाहणीत रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचे समोर आले
Amashya Padvi
Amashya PadviSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदूरबार : पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांचे काम केले जाते. मात्र सदरचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याला कारण म्हणजे रस्त्याचे काम करत असताना ठेकेदार आणि इंजिनिअर यांच्या पार्टनशीप असल्याने काम निकृष्ट होत असल्याचा गंभीर आरोप आमदार आमश्या पाडवी यांनी केला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या गोरंबा येथे निगधी ते लेगापाणी रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत सुरू असून कामाच्या ठिकाणी अक्कलकुवा धडगाव मतदार संघाचे आमदार आमश्या पाडवी यांनी अचानक भेट देत कामाची पाहणी केली. या पाहणीत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर आले आहे. यावेळी आमदार आमश्या पाडवी ठेकेदारावर चांगलेच संतापले.  

Amashya Padvi
Water Crisis : येवला तालुक्यात आतापासूनच दुष्काळाची चाहूल; विहिरीतील पाणी आटल्याने टँकरची होतेय मागणी

कामांच्या चौकशीची मागणी 

आमदार पाडवी यांनी रस्त्याची पाहणी करत संबंधित ठेकेदाराला रस्ता दर्जेदार बनवण्याची सूचना दिल्या असून धडगाव- अक्कलकुवा तालुक्यात सुरू असलेल्या कामांची चौकशीची मागणी आमदार पाडवी यांनी केली आहे. तसेच या परिसरात ठेकेदार आणि इंजिनियर यांची पार्टनरशिप राहत असल्याचे गंभीर आरोप देखील आमदार आमश्या पाडवी यांनी केले आहे.

Amashya Padvi
Bhiwandi Police : ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचे कारनामे उघड; भिवंडीतून ३ जणांना अटक

आमदारांची १५ किमी पायपीट 

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्ग भागात पहिल्यांदाच आमदार आमश्या पाडवी पोहोचले. साधारण १५ किलोमीटरची पायपीट करत आमदार आमश्या पाडवी दुर्गम भागात पोहोचले. दुर्गम भागात सुरू असलेल्या कामांच्या पाहण्यासाठी अक्कलकुवा अक्राणी मतदार संघाचे आमदारांची पायपीट करून आदिवासी पाड्यांवर जायला रस्ते नसल्याने डोंगराळ भागातून नदी नाल्यातून प्रवास केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com