New Parlimet Building Inaguration  Saam Tv
देश विदेश

Parliament's Special Session: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर नव्या संसदेचा 'श्रीगणेशा'... आजपासून सुरू होणार कामकाज

Parliament's Special Session Update: सर्वत्र गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच याच शुभमुहूर्तावर आजपासून नव्या संसदेचा श्रीगणेशा होणार आहे.

Gangappa Pujari

Parliament's Special Session in New Building:

देशभरात गणपती बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वत्र गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच याच शुभमुहूर्तावर आजपासून नव्या संसदेचा श्रीगणेशा होणार आहे. नव्या संसदेत आज दुपारी १ वाजल्यापासून कामकाजाला सुरूवात होईल.

आजपासून संसदेच्या नवीन इमारतीचा श्रीगणेशा होणार आहे. लोकसभेचे कामकाज दुपारी 1:15 वाजता सुरू होईल, तर राज्यसभेचे कामकाज 2:15 वाजता सुरू होईल. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये एकूण 1280 सभासदांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या वर्षी मे महिन्यात या नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले होते. या इमारतीमध्ये लोकसभेच्या चेंबरमध्ये 888 सदस्य आणि राज्यसभेच्या चेंबरमध्ये 300 सदस्य आरामात बसू शकतात. दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक झाल्यास लोकसभेच्या सभागृहात एकूण १२८० सदस्य बसू शकतात.

केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नवीन संसद भवन तयार करण्यात आले आहे. 64,500 चौरस मीटरमध्ये पसरलेली ही चार मजली इमारत त्रिकोणी आकाराची आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जुन्या संसद भवनापेक्षा नवी संसद भवन सुमारे १७,००० चौरस मीटर मोठे आहे. यासाठी 971 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Jalgaon Crime News : जळगाव पुन्हा हादरले; भररस्त्यात गाठून तरुणाची हत्या

Jyoti Chandekar: 'तू फसवलंस आजी...'; पूर्णा आजीला निरोप देताना 'ठरलं तर मग' परिवाराचे अश्रू अनावर

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT