Supriya Sule Speech: सुप्रिया सुळेंनी संसदेत पंतप्रधान मोदींचं केलं कौतुक; दिवगंत भाजप नेत्यांची आठवण करत काढला चिमटा

Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांचं कौतुक केलं. आज मी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचं कौतुक करते. प्रशासनात सातत्य असल्यानं त्यांनी कौतुक केलं.
Supriya Sule Speech
Supriya Sule Speechsaam Tv

Special Session of Parliament:

राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांचं कौतुक केलं. आज मी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचं कौतुक करते. प्रशासनात सातत्य असल्यानं त्यांनी कौतुक केलं. गेल्या ७ दशकांमध्ये देशाच्या उभारणीत विविध लोकांनी योगदान दिलं. त्या सर्वजण आपल्याला समान प्रिय आहेत. आजपासून संसदेचं विशेष सत्र सुरू झालंय.

या सत्राच्या पहिल्या दिवसाचा कारभार हा जुन्या संसदेत झाला. तर उद्या नव्या संसदेच्या इमारतीमध्ये कारभार चालणार आहे. आज जुन्या संसदेत होणाऱ्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान मोदींनीही आपल्या भाषणात संसदेच्या ७५ वर्षांच्या इतिहासाची आठवण केली. (Latest Politics News)

पंतप्रधान मोदींचं कौतुक

मोदींचं भाषण झाल्यानंतर त्यांच्या भाषणांचं कौतुक केलं गेलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही पंतप्रधान मोदींच्या भाषणाचं कौतुक केलं. त्याचवेळी त्यांनी भाजप नेत्यांना चिमटा काढला आणि त्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. आज मी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचं कौतुक करते. त्यांनी प्रशासनात सातत्य असल्याचं म्हटलं. या देशाच्या निर्माणासाठी मागील सात दशकांमध्ये विविध लोकांनी योगदान दिलंय. त्यांना आपण सर्वजण प्रेम करतो, आदर करतो असल्याचं मोदी म्हणाले.

भाजप नेत्यांचं केलं स्मरण

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपण इंडिया म्हणो किंवा भारत हा आपला देश आहे. आपण सर्वजण येथे जन्मलो. आपण सर्वजण येथे येऊन धन्य झालो. ज्या दोन लोकांची आठवण भाजप नेत्यांनी काढली नाही त्या नेत्यांचं नाव मी पटलावर घेऊ इच्छिते. या दोन्ही नेत्यांच्या संसदीय कार्याचं माझ्यावर प्रभाव आहे. त्याच्यापासून मी प्रभावित आहे. ते नेते भाजपचे आहेत. मला वाटतं ते मोठे नेते होते आणि असाधारण खासदार होते.

त्यांचा आम्ही आदर करतो. हे दोन नेते आहेत सुषमा स्वराज आणि अरुण जेटली. ते नेहमी सहकार आणि संघराज्याबद्दल बोलायचे. आम्ही विरोधी पक्षात होतो. तरीदेखील सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. तुम्ही सत्ताधारी असा किंवा विरोधक चांगल्या कामाचे काैतुक व्हायलाच हवे,असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

भाजप नेत्यांचा समाचार

भाजप नेत्यांकडून राजकीय विधानं केल्यामुळे सुप्रिया सुळे चिडल्या. परंतु त्यांनी शेलक्या शब्दात त्या नेत्यांचा समाचार घेतला. सत्ताधारी पक्षातील काही खासदारांनी राजकीय वक्तव्ये करण्याआधी त्यांनी पंतप्रधानांचे भाषण ऐकून मत मांडणे अपेक्षित होतं. महिला आरक्षणावर काँग्रेसनं काय केलं असा प्रश्न करणाऱ्या नेत्यांचाही त्यांनी समाचार घेतला.

देशातील पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष मीरा कुमारी या काँग्रेसच्या होत्या. संसदेत हे बिल मांडण्यात देखील आलं होतं. पण ते पास होऊ शकलं नाही. तसेच देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना आरक्षण देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य होतं. तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब यांच्या कार्यकाळात ते बील पास करण्यात आलं. देशातील निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. जर आपण नवीन संसदेत जात असताना पहिला निर्णय महिला आरक्षणाचा घेतला तर आमचा त्याला पाठिंबा असेल.

Supriya Sule Speech
Supriya Sule In Baramati News | जालना घटनेवरून सुप्रिया सुळे राज्य सरकारवर कडाडल्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com