Special Session of Parliament  SAAM TV
देश विदेश

Parliament Session: संसदेत पुन्हा घमासान! PM मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार; राहुल गांधींच्या आरोपांवर काय बोलणार?

Parliament Session 2024 Live updates: हिंदुत्व, अयोध्या, जम्मू-काश्मीर, अग्निवीरसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्युत्तर देतील अशी शक्यता आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. २ जुलै २०२४

आज संसदेच्या विशेष अधिवेशनाचा सातवा दिवस. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देतील. सायंकाळी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलण्याची शक्यता आहे. काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनेक मुद्द्यांवर मोदी सरकारला धारेवर धरले होते. या आरोपांना आज पंतप्रधान मोदी उत्तर देतील. त्यामुळे पंतप्रधान संसदेत काय बोलणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लोकसभा संसदेतील कालचा दिवस विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गाजवला. लोकसभा निवडणूक, हिंदूत्व, राममंदिर, अयोध्येमधील भाजपचा पराभव, नीट परीक्षा, मणिपूर, जम्मू- काश्मिरसह अनेक विषयांवर राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरले. राहुल गांधींच्या या आक्रमकतेमुळे भाजप नेत्यांची चांगलीच कोंडी केली.

आज पंतप्रधान मोदी राहुल गांधींच्या या आरोपांना उत्तर देतील. हिंदुत्व, अयोध्या, जम्मू-काश्मीर, अग्निवीरसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्युत्तर देतील अशी शक्यता आहे.

दरम्यान, एनडीए सरकारच्या संसदीय दलाची आज सकाळी ९.३० वाजता बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह घटक पक्षातील महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. काल राहुल गांधींचे आक्रमक भाषण, लोकसभेत झालेल्या गदारोळानंतर NDA घटकपक्ष आजची संसदेतील रणनीती आखण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Kelkar: जरतारी काठ, नऊवारी थाट, मोगर गजरा साजे केसात...

Rahul Gandhi PC Highlights: मतचोरीचे अ‍ॅडिशन- डिलीशन पुराव्यासह दाखवले, राहुल गांधींचे 10 गंभीर आरोप

Pune : पुणे रिंग रोडबाबत मोठी अपडेट, प्रकल्पाचा Phase 1 अंतिम टप्प्यात, PMRDA शेतकऱ्यांना भरपाई देणार

Maharashtra Live News Update: आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

वाढत्या वयानुसार महिलांना व्हाइट डिस्चार्जची समस्या अधिक का सतावते?

SCROLL FOR NEXT