PM Narendra Modi| Mallikaarjun Kharge Saamtv
देश विदेश

Parliament Session: 'भाजपचा गर्व संपवणारी निवडणूक, पंतप्रधान फक्त 'मन की बात'मध्ये व्यस्त; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; राज्यसभेत घमासान!

Parliament Session 2024 Live Updates: राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले. यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. १ जुलै २०२४

एकीकडे राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी- विरोधकांमध्ये घमासान पाहायला मिळत असतानाच संसदेतही इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए सरकारमध्ये जुगलबंदी पाहायला मिळत आहे. आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले. यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "कभी घमंड मत करना, तकदीर बदलती रहती है. शीशा वही रहता है, तस्वीर बदलती रहती है," अशा खास शायराना अंदाजात खरगे यांनी मोदी सरकारचे वाभाडे काढले.

काय म्हणाले मल्लिकार्जून खरगे?

"2024 ची निवडणूक भाजपचा गर्व संपवणारी निवडणूक होती, म्हणूनच 17 मंत्र्यांचा पराभव झाला. मागील सरकारचे 17 मंत्री निवडणुकीत पराभूत झाले. शेतकऱ्यांना जीपने पायदळी तुडवणाऱ्या मंत्र्याला हटवण्याची मागणी आम्ही करत होतो. पण जनतेने त्यांना पायदळी तुडवले आणि ते संपले. आता 400 पारचा नारा द्यायची गरज नाही. 400 पारचा नारा दिला पण तरीही निवडणुकीचा निकाल तुमच्या बाजूने आला नाही," असे ते म्हणाले.

"जेव्हा आम्ही पेपर लीक आणि बेरोजगारीबद्दल बोलतो तेव्हा मोदीजी मंगळसूत्र आणि मुजऱ्याबद्दल बोलतात. जेव्हा आपण महागाईबद्दल बोलतो तेव्हा भाजप परदेशातील महागाईबद्दल बोलू लागतो. जेव्हा विरोधक जनतेबद्दल बोलतात तेव्हा मोदीजी त्यांच्या मनातले बोलू लागतात. ते फक्त त्यांची मन की बातमध्ये व्यस्त असतात," असे म्हणत मल्लिकार्जून खरगे यांनी भाजप सरकारवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT