Parliament Security Breach Saam Tv
देश विदेश

Parliament Security Breach: संसदेच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक; एकाच आधारकार्डावर तिघांचा प्रवेश, CISF कडून तिघांना अटक

Parliament Security Breach Case: संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशातील संसदेच्या सुरक्षेचा भंग करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आला आहे. मे महिन्यात तिघेजण बनावट कागदपत्रे दाखवून संसदेच घुसले होते. संसदेच घुसून त्यांनी सुरक्षेचा भंग केला आहे. याचप्रकरणी तिघांना ४ जून रोजी अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तिघांनीही एकच आधार कार्ड वापरुन संसदेत प्रवेश घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संसदेतील IG-3 गेटमधून मोनिस आणि कासिम यांनी एकच आधार कार्ड दाखवून संसदेत प्रवेश केला. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी एका कटाचा भाग म्हणून बनावट कागदपत्रे तयार केली होती. ही कागदपत्रे त्यांनी संसदेत प्रवेश मिळवण्यासाठी वापरले. संसदेच्या सुरक्षा पथकाने त्यांची कागदपत्रे तपासल्यावर सारखा आधार नंबर असल्याचे समजले. एकच आधार नंबर परंतु तीन वेगवेगळे फोटो समोर आले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी या तिघांवरही गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे. कासिम, मोनिस आणि शोएब अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत बनावटगिरी आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीआयएनने ४ जून रोजी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांना चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. या तिघांनीही ४ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास बनावट कागदपत्रे दाखवून संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.

याआधीही ससंदेच्या सुरक्षेचा भंग करण्याचा प्रयत्न

याआधीही १३ डिसेंबर रोजी संसदेत सुरक्षेचा भंग करण्यात आला होता. १३ डिसेंबरला लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन लोकांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारील संसदेत धूर सोडला होता. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PUC Certificate Price : पीयूसीच्या किंमतीत वाढ करा, अन्यथा राज्यव्यापी संपावर जाऊ, फडणवीस सरकारला इशारा

Maharashtra Live News Update: मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा; पुण्यातल्या महिलेचा अजित पवारांना सकाळीच सल्ला

Weather Update : परतीचा पाऊस झोडपणार! रायगड, पुण्याला कोसळधारेचा अंदाज, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Shani Dev Rashi: 'या' राशींवर शनीदेवाची नेहमीच असते कृपा; प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना मिळतं यश

Xiaomi 14 Civi Offer: सणासुदीला मोठी संधी! Amazon सेलमध्ये Xiaomi 14 Civi वर बंपर ऑफर, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

SCROLL FOR NEXT