Pakistanis on PM Modi: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) हे जगातील सर्वात लोकप्रिय राजकारण्यांपैकी एक आहेत. पाकिस्तानातही त्यांना पसंत करणारा एक मोठा वर्ग आहे. पाकिस्तानी मुस्लिमांचे असे अनेक समुदाय आहेत जे मोदींची स्तुती करत असतात.
सध्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे एनआयडी फाउंडेशनने आयोजित केलेल्या 'विश्व सद्भावना कार्यक्रमात' (Vishwa Sadbhawana event) पाकिस्तानी नागरिकांच्या तोंडून 'मोदी है तो मुमकिन है...'चा नाद घुमत आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भारतीय अल्पसंख्याक फाउंडेशन (IMF), एनआयडी फाउंडेशन (दिल्ली) आणि ऑस्ट्रेलियातील नामधारी शीख सोसायटीने 23 एप्रिल रोजी जागतिक सद्भावना कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये धार्मिक नेते, विचारवंत, विद्वान, प्रचारक आणि संशोधक सहभागी झाले होते. त्याचवेळी विविध धार्मिक समुदायातील पाकिस्तानी लोकही आले होते. त्यातील अनेक अहमदिया मुस्लिम समाजाचे होते.
पाकिस्तानातील अहमदिया समुदायाच्या मुस्लिमांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, मोदी हे सर्व समुदायांचा आदर करतात, हे आम्हाला आवडतं. यासोबतच सर्वाना सोबत घेऊन जाण्याची त्यांच्यात क्षमता आहे. म्हणूनच आम्ही त्याची स्तुती करतो.
लाहोरचे अहमदिया मुस्लिम समुदायाचे सदस्य डॉ. तारिक बट म्हणाले, “मी वैयक्तिकरित्या असे म्हणू शकतो की माझे बरेच मित्र भारतीय आहेत आणि मी त्यांना अनेक उपक्रम एकत्र करताना पाहिले आहेत. मी स्वतः त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतो. आता भारतीय मुस्लिम आणि पाकिस्तानी मुस्लिम यांच्यात एकोपा वाढत आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.