Pakistani Youtuber Shot Dead Saam Tv News
देश विदेश

Pakistani Youtuber Shot Dead: भारत Vs पाकिस्तान मॅचवर बनवत होता व्हिडीओ, संतप्त सिक्योरिटी गार्डने युट्यूबरची गोळी झाडून केली हत्या

India Vs Pakistan T-20 World Cup: पाकिस्तानच्या कराचीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर व्हिडीओ शूट करणाऱ्या एका युट्यूबरची सुरक्षारक्षकाने गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Priya More

भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये ९ जून रोजी टी-२० वर्ल्ड कप २०२४ चा सामना (India Vs Pakistan T 20 Match) न्यूयॉर्कमध्ये झाला. भारतीय संघाने या सामन्यात पाकिस्तानी संघाचा दारूण पराबव केला. हा सामना भारताने ६ धावांनी जिंकला. या सामन्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी खूपच नाराज झाले. याच सामन्याशी संबंधित एक धक्कादायक घटना पाकिस्तानातून समोर आली आहे. कराचीमध्ये सुरक्षारक्षकाने एका युट्यूबरची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, साद अहमद असे या हत्या झालेल्या युट्युबरचे नाव आहे. युट्युबर साद हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर लोकांची प्रतिक्रिया घेत होता. हा व्हिडीओ तयार करण्यासाठी तो कराचीमधील मोबाईल मार्केटमध्ये गेला होता. यावेळी या सामन्यासंदर्भात त्याने अनेक मोबाईल दुकानदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या. हा व्हिडीओ तयार करत असताना तो एका सिक्योरिटी गार्डसमोर आला आणि त्याने त्याचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने सामन्यासंदर्भात विचारलेला प्रश्न ऐकून सिक्योरिटी गार्ड संतापला. त्याने सादवर गोळ्या झाडल्या. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सादचा मृत्यू झाला.

सादने सिक्योरिटी गार्डसमोर माइक्रोफोन ठेवल्यामुळे तो संतापला. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, सिक्योरिटी गार्ड संतप्त झाला त्याने स्वत:जवळ असलेल्या बंदुकीनेच सादवर गोळी झाडली. त्यामुळे सादचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी सादला तात्काळ रुग्णालयात नेले पण त्याला मृत घोषीत केले. या घटनेमुळे कराचीच्या मोबाईल मार्केटमध्ये मोठा गोंधळ उडाला होता.

जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सादच्या मित्राने सांगितले की, साद कुटुंबातील एकमेव कमावणारा व्यक्ती होता. साद विवाहित होता. त्याला दोन मुलं देखील आहेत. या घटनेमुळे सादच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी सांगितले की, अहमद गुल नावाच्या ३५ वर्षीय सिक्योरिटी गार्डने २४ वर्षीय साद अहमदवर गोळीबार केला. ही घटना बफर झोन परिसरातील सेरिना मोबाइल मॉलजवळ घडली होती.

पोलिसांनी पुढे असे देखील सांगितले की, सिक्योरिटी गार्डने तरुणाला थांबले आणि नंतर त्याच्यावर गोळी झाडली. ही घटना तैमुरिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. सिक्योरिटी गार्डला अटक करण्यात आली आहे. सिक्योरीटी गार्डने पोलिस चौकशीदरम्यान सांगितले की, साद व्हिडीओ शूट करत असताना त्याच्याकडे हातवारे करत होता. त्यामुळे तो संतप्त झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

SCROLL FOR NEXT