NEET 2024 Result : चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित करा; नीटच्या निकालावरून राज्याची केंद्राकडे मागणी

NEET 2024 Result Scam : नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना ७१८, ७१९ गुण मिळाल्याने परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे बोलले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर चौकशी होईपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित करा, अशी मागणी केली जात आहे.
NEET 2024 Result
NEET 2024 Result Saam Tv

देशातील दुसऱ्या नंबरची सर्वात कठीण परिक्षा म्हणजे नीट. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी नीटची परीक्षा द्यावी लागते. परंतु नीट परिक्षेत घोटाळा झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे. नीट परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना ७१८, ७१९ मार्क मिळाले आहेत. त्यामुळे परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित करा, अशी मागणी करण्यात येत आहे.

नीट परीक्षेबाबत राज्याने प्रशासनाकडे ग्रेस मार्क रद्द करण्याची मागणी केली आहे. 'ग्रेस मार्क रद्द करा, सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पु्न्हा एका मुल्यांकन करुन सुधारित निकाल द्यावा', अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. सर्व उत्तरपत्रिकांचे ऑडिट करण्याचेही मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत केंद्रिय स्तरावरील प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याची विनंतीसुद्धा राज्याच्या वैद्यकीय विभागाने केंद्राच्या आरोग्य विभागाला केली आहे. पत्र पाठवून ही विनंती करण्यात आली आहे.

'नीट युजी परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात यावी. या परीक्षेत दिलेल्या ग्रेस मार्क्सचा आढावा घेऊन उच्चस्तरीय समितीमार्फत तात्काळ कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा', अशी मागणी धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकार यांनी केली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे.

NEET 2024 Result
'NEET' परीक्षेत घोटाळा; देशभरात विद्यार्थी रस्त्यावर,परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी

नीट परीक्षा ही व्यावसायिक परीक्षा सिस्टिम ऑफ एलिमिनेशनवर आधारित आहे. या परीक्षेत बऱ्याच विद्यार्थ्यांना ७१८, ७१९ गुण प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच ही परीक्षा पुन्हा एकदा घ्यावी, अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.

नीट युजीसी परीक्षेत झालेल्या घोटाळ्यानंतर आता एनटीएवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. एनटीएविरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहे. याप्रकरणी एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. दरम्यान आंध्र प्रदेशमध्ये याविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. एका विशिष्ट केंद्रातील ६७ विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाले आहेत, असं या याचिकेत नमूद केले आहेत. त्यामुळे ही परिक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी आता करण्यात आली आहे.

NEET 2024 Result
BJP New President: जेपी नड्डा यांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश, कोण होणार नवीन भाजप अध्यक्ष? विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com