Neet Student Protest : नीट परीक्षा रद्द करा; राज्यभरातील विद्यार्थी आक्रमक, ठिकठिकाणी आंदोलन आणि निदर्शने

Neet Student Protest Against 2024 Result : नीट परीक्षेमध्ये 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेत त्यामुळे यावर अक्षेप घेत परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप काही विद्यार्थी करत आहेत.
Neet Student Protest
Neet Student ProtestSaam TV

महाराष्ट्रात सध्या नीट परीक्षेचा मुद्दा चर्चेत आहे. नीट परीक्षेमध्ये 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेत त्यामुळे यावर अक्षेप घेत परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप काही विद्यार्थी करत आहेत. तसेच आज सकाळपासूनच राज्यात ठिकठिकाणी नीट परीक्षेच्या निकालाविरोधात निदर्शने सुरु आहेत.

Neet Student Protest
Student Internet Activities: मुलं अभ्यास सोडून मोबाईलवर काय पाहतात? प्रत्येक पालकाला माहित असावी, अशी महिती रिपोर्ट्समधून उघड

नीट प्रशासनाच्या विरोधात पुण्यात ABVP आक्रमक

नीट प्रशासनाकडे ABVP कडून परीक्षा रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आज आंदोलन करण्यात आले, यामध्ये अनेक विद्यार्थी देखील सहभागी होते. निकालाची फेरतपासणी करून निकाल परत देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

चाळीसगाव तहसील कचेरीच्या दिशेने मोर्चा

NEET परीक्षेत घोटाळा केलाचा आरोप करत हजारोच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. जळगावच्या चाळीसगावमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून NTA विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहेत. चाळीसगाव तहसील कचेरीच्या दिशेने देखील विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला आहे.

छत्रपती संभाजी नगरमध्ये निदर्शने

नीट परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजी नगरमध्ये विद्यार्थ्यांनी एकत्र येत मुक निदर्शने सुरु केली. छत्रपती संभाजी नगर शहरातील क्रांती चौकात नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आणि हातात वेगवेगळ्या प्रकारचे फलक घेत निषेध व्यक्त केलाय.

Neet Student Protest
Student Viral Video: जिंकलस मित्रा! शाळकरी मुलगा चक्क धावत्या स्कूटीवर करतोय अभ्यास;VIDEO VIRAL

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com