Pakistani news and celebrity social media accounts ban lifted :जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला दणका देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. या दरम्यान, भारतानं पाकिस्तानी न्यूज चॅनल आणि सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंटवर बंदी घातली होती. मात्र, आता ती बंदी उठवण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे न्यूज चॅनल आणि सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाउंट्स आता पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत.
याशिवाय, अनेक पाकिस्तानी न्यूज आणि एन्टरटेन्मेंट चॅनलच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरील स्ट्रिमिंग भारतात पुन्हा दिसायला सुरुवात झाली आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा यामागे हात असल्याचा संशय होता. हल्ल्यानंतर भारत सरकारनं ऑपरेशन सिंदूर राबवलं. त्याअंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं सोशल मीडिया स्ट्राइकही केला. १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनलवर बंदी घातली.
त्यात डॉन न्यूज, समा टीव्ही, जियो न्यूज यांसारख्या चॅनलचा समावेश होता. भारताविरुद्ध दुष्प्रचार, खोटी माहिती आणि धार्मिक चिथावणी देणारा कंटेंट प्रसारित करण्याचा आरोप होता. सूत्रांच्या माहितीनुसार, या चॅनल्सने भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांच्या विरोधात खोट्या आणि भ्रम पसरवणारे नरेटिव्ह पसरवले होते.
व्हीपीएनद्वारे अकाउंट्स अॅक्सेस
पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंटवर बंदी घातल्यानंतरही अनेक भारतीय यूजर्सने व्हीपीएन अर्थात व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कच्या माध्यमातून आपल्या आवडत्या सेलिब्रिटिंचे अकाउंटला अॅक्सेस केले होते. त्यात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसारख्या कलाकारांचा समावेश आहे. सध्या हानिया ही दिलजीत दोसांजच्या सरदारजी ३ या चित्रपटातील भूमिकेमुळं सध्या भारतात प्रचंड चर्चेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.