Pakistan Baloch Clash saam tv
देश विदेश

Pakistan News: पाकिस्तान तुटला; सुराब शहरावर बलुच आर्मीचा कब्जा

Pakistan Baloch Clash: भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱा पाकिस्तान सध्या चिंतेत आहे. घाबरलेला आहे. कारण भारतासोबत युद्धाच्या वल्गना करणाऱ्या पाकिस्तानची शहरंच्या शहरं जळू लागलीयेत. पाकिस्तानला आता अंतर्गत आव्हानांनी पुरतं बेजार केलंय. काय घडतंय शत्रूच्या घरात पाहूया या रिपोर्टमध्ये..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशाचा शत्रू पाकिस्तान. सध्या बेजार, बेरोजगार, भयभीत आहे त्याला कारण आहे बलुच लिबरेशन आर्मी. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या पाकिस्तानला आता मात्र अंतर्गत बंडाळीच्या लाथा खाव्या लागताहेत. होय. पाकिस्तानला खुल्लं चॅलेंज देणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीनं आता पाक विरोधी युद्धात एक मोठं यश मिळवलंय. बलुच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानचं सुराब शहर ताब्यात घेत पाकिस्तानी सैन्याच्या सुरक्षेच्या दाव्याला उडवून लावलंय.

स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीनं काय केलंय. पाहूया.

पाकचं शहर बलुचच्या ताब्यात

पाकिस्तानसाठी महत्वाचं शहर सुराबवर बलुच आर्मीचा कब्जा

सुराब शहरातील सरकारी इमारती बलुच आर्मीच्या ताब्यात

बँक आणि पोलिस चौक्यांवर स्वतंत्र बलुचिस्तानचा झेंडा

मुख्य पोलिस ठाण्याला बलुच आर्मीनं लावली आग

बलुच आर्मीनं केला क्वेटा कराची महामार्ग बंद

भारतानं पाकिस्तानात घुसून दहशतवाद्याचे कंबरडे मोडलं. ऑपरेशन सिंदूरनं जगाला पाकिस्तानातील दहशतवादी तळ आणि अकार्यक्षम लष्कराची ओळख झाली. हीच नाचक्की रोखण्यासाठी पाकनं घाईघाईत लष्कर प्रमुख मुनीरला फिल्ड मार्शल म्हणून गौरवलं पण याच फिल्ड मार्शलनं पुन्हा आपला निकम्मेपणा पणा जगासमोर दाखवून दिलाय. आतापर्यंत बलुच लिबरेशन आर्मीच्या जाबांज जवानांनी पाकची मस्ती कशी जिरवली पाहूयात.

बलुचनं जिरवली पाकची मस्ती

गदानी जेलमधून कैद्यांची सुटका

क्वेटा-कराची महामार्ग बंद

जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक, 67 जणांचा मृत्यू

नोशकी बस हल्ला, 90 पाक सैनिक ठार

एप्रिलमध्ये 4 हल्ल्यात 50 हून अधिक पाक जवान ठार

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पासून अवघ्या ५०० मैलावर असणारं सुराबशहर आज बलुचच्या ताब्यात आहे. बलुची नागरिक त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आता आक्रमक झालेत शहर ताब्यात घेत त्यांनी पाकची मोहल्ल्या मोहल्यांमध्ये नाकेबंदी केल्याचं वारंवार दिसतंय. पाकाड्यांच्या कर्माचं घड्याळ वेगानं फिरतंय. त्यामुळे लवकरचं आझाद बलुचिस्तानच्या स्वांतत्र्याचा बिगुल वाजेल आणि जगाला एक नवा बलुचिस्तान नावाचा देश मिळेल अशी शक्यता दिसतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

SCROLL FOR NEXT