Prime Ministers Shahbaz sharif Saam
देश विदेश

'पाकिस्तानने ७ भारतीय लढाऊ विमाने पाडली, त्यांना भंगार..' पंतप्रधानांचा मोठा दावा, ट्रम्पचंही कौतुक

Prime Ministers Shahbaz sharif: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा मोठा दावा. पाकिस्तानने भारताचे ७ विमाने पाडल्याचा दावा. ट्रम्पचंही कौतुक.

Bhagyashree Kamble

  • पाकिस्तानने ७ भारतीय लढाऊ विमाने पाडली.

  • पंतप्रधान शहबाज शरीफांचा दावा.

  • भारताने पाकिस्तानने केलेले दावे फेटाळले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अलिकडेच मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं की, या वर्षी झालेल्या भारत - पाक संघर्षात पाकिस्तानी हवाई दलानं भारताची तब्बल सात विमाने पाडली. हा दावा त्यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केला आहे. 'आम्ही भारताची लढाऊ विमाने भंगार केली', असे विधानही यावेळी त्यांनी केले.

शहबाज शरीफ यांचा हल्लाबोल

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गुरुवारी (२६ सप्टेंबर २०२५) भारताविरुद्ध तीव्र हल्ला चढवला. त्यांनी मे २०२५ मधील सीमापार संघर्षात पाकिस्तानी हवाई दलाने ७ भारतीय लढाऊ विमाने करून पाडल्याचा दावा केला. "आमच्या लढवय्यांनी उड्डाण केले आणि ७ भारतीय विमाने पडली'', असे शरीफ यांनी म्हटले. पाकिस्तानने सुरुवातीला ५ विमाने पाडल्याचा दावा केला होता, नंतर ७ असा उल्लेख केला.

परंतु, भारताने हे दावे निराधार आणि पुराव्याशिवाय असल्याचं सांगत फेटाळून लावले आहे.

शरीफ यांचा भारतावर आरोप

शरीफ यांनी आरोप केला की, भारताने २०२५ मध्ये, 'ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानवर हल्ला केला. ७ मे रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली होती. यात २६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. भारतानं या घटनेचा वापर राजकीय फायद्यासाठी केला' असा थेट आरोप शरीफ यांनी केला.

भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणांवर हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. भारतीय सैन्याने खात्री करून घेतली की, या कारवाईत फक्त दहशतवादी पायाभूत सुविधांनाच लक्ष्य केले जाईल. कोणत्याही नागरिक अथवा पाकिस्तानी लष्करी कर्मचाऱ्याला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेतली गेली. या कारवाईनंतर पाकिस्तानचे पोलीस महासंचालक यांनी भारतीय DGMO यांच्याशी संपर्क साधला. चर्चेनंतर युद्धबंदी जाहीर करण्यात आली.

शरीफ यांचे ट्रम्पप्रति कौतुक

पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरीफ यांनी ट्रम्प यांचं कौतुक केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारत पाकिस्तान युद्धबंदी शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT