महामार्गावर भीषण अपघात! पहाटे वाहन डिव्हायडरला धडकले; ५ जणांचा मृत्यू, १ गंभीर जखमी

Car Accident 5 Dead: दिल्ली - जयपूर महामार्गावरील झाडसा चौकात भीषण कार अपघात. पाच जणांचा, १ गंभीर जखमी. पोलिसांकडून तपास सुरू.
Delhi–Jaipur Expressway Tragedy
Delhi–Jaipur Expressway TragedySaam
Published On
Summary
  • दिल्ली - जयपूर महामार्गावर भीषण अपघात.

  • भरधाव कार दुभाजकावर धडकली.

  • एकूण ५ जणांचा मृत्यू.

शनिवारी सकाळी दिल्ली - जयपूर महामार्गावरील झाडसा चौकात भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव चारचाकी वाहन दुभाजकावर धडकले. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. जखमी व्यक्तीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या भीषण अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

अपघात कसा घडला?

गुरूग्राम परिसरात शनिवार २७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला. दिल्ली - जयपूर महामार्गावरील झाडसा चौकात भरधाव चारचाकी वाहन येत होते. चारचाकीचे नियंत्रण सुटल्याने थेट दुभाजकाला धडकली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

Delhi–Jaipur Expressway Tragedy
Bihar: मोठी बातमी! आजपासून 'या' लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार १० हजार, नेमकी योजना काय?

त्यामुळे वाहन थेट दुभाजकाला घडकली. नंतर अनेकवेळा उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार, वाहन दिल्लीहून गुरूग्रामच्या दिशेनं जात होती. कारमध्ये एकूण सहा जण होते. ज्यात ३ तरूण आणि ३ तरूणींचा समावेश होता. या अपघात २ तरूण आणि २ तरूणींचा मृत्यू झाला.

Delhi–Jaipur Expressway Tragedy
भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

तर, एका तरूणीचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, एका तरूणावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले आहे. सध्या पोलीस मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com