Bihar: मोठी बातमी! आजपासून 'या' लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार १० हजार, नेमकी योजना काय?

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana: महिलांसाठी खास योजना सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री  महिला रोजगार योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात १० हजार रूपये जमा होतील.
Mukhyamantri Mahila Rojgar Yojana
Mukhyamantri Mahila Rojgar YojanaSaam tv
Published On
Summary
  • ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’चा शुभारंभ

  • प्रत्येकी लाभार्थीच्या खात्यात १० हजार जमा होणार.

  • आजपासून योजनेला सुरूवात.

राज्य सरकारसह केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली. तशीच बिहारने देखील महिलांसाठी खास योजना राबवली आहे. मुख्यमंत्री महिला रोजगार असं योजनेचं नाव असून, या योजनेतून महिलांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रूपये जमा होतील. या योजनेद्वारे केंद्र सरकार महिलांना आर्थिक मदत करणार आहेत.

आज २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्यातील ७५ लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी १० हजार थेट जमा केले जाणार आहे. यासाठी एकूण ७,५०० कोटी रूपयांचा निधी वितरीत केला जाणार आहे.

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana
पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

शुभारंभाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यात १० हजाराचा पहिला हफ्ता थेट हस्तांतरित केला जाणार आहे. ही रक्कम बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पाठवले जणार आहे. एका महिलेच्या खात्यात एकूण २.१० लाखांपर्यंत निधी जमा होऊ शकते. सरकार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना १० हजार ते २ लाखांपर्यंतचे लोन देणार आहेत.

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana
ग्राहकांसाठी खूशखबर! सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; १० तोळ्यामध्ये ९,३०० रूपयांची घट, पाहा लेटेस्ट दर

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत १.६ कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलाय. यामुळे लघुउद्योग आणि आर्थिक मदत महिलांना मिळणार आहे. या उपक्रमामुळे महिलांना आर्थिक मदतीसोबतच सक्षमीकरणासाठी एक व्यापक मंच मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com