Imran Khan
Imran Khan Saam Tv
देश विदेश

इम्रान खान यांची शेवटची आशा संपली; पाकचे पंतप्रधान आज देणार राजीनामा !

वृत्तसंस्था

इस्लामाबाद: इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक- ए- इन्साफ (PTI) सरकारचा मुख्य सहकारी भागीदार असलेल्या मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट पाकिस्तान (एमक्यूएम) ने पंतप्रधान (Prime Minister) इम्रान यांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टी सोबत करार करण्यात आला आहे. खान याना मोठा धक्का बसला आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, पीपीपी अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी केलेल्या घोषणेबद्दल इम्रान खान आणि त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. खरं तर, इम्रान खानला (Imran Khan) बिलावलच्या ट्विटमधून त्यांची सत्ता बुडल्याची माहिती मिळाली. ज्यात त्यांनी लिहिले की, 'संयुक्त विरोधी पक्ष आणि एमक्यूएममध्ये सहमती झाली आहे. राबता समिती लवकरच एमक्यूएम आणि पीपीपी यांच्यातील कराराचा तपशील शेअर करेल. उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण माहिती मीडियासमोर (media) सांगणार आहे. "पाकिस्तानचे (Pakistan) अभिनंदन".

पीटीआय सरकारने गमावले बहुमत?

त्यामुळे इमरान खानची खुर्ची हिसकावून घेण्यासाठी अवघे काही तास उरले असल्याचे बोलले जात आहे. कारण 31 मार्च रोजी इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावापूर्वी रात्री उशिरा घडलेल्या घडामोडीनंतर पीटीआयच्या सरकारने (government) बहुमत गमावले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut News: एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा!

Fruits In Summer: उन्हाळ्यात खा ही ५ फळे, शरीराला मिळेल थंडावा

Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू

Today's Marathi News Live: गुन्हेगारांचं सोशल मीडियावर पुन्हा एकदा उदात्तीकरण; गुंड गजानन मारणेचा व्हिडिओ व्हायरल

Solapur Crime News: दुहेरी हत्याकांडाने माळशिरस हादरले; दिवसाढवळ्या चाकूने भोसकून दोघांची हत्या

SCROLL FOR NEXT