नवनीत राणांच्या तक्रारीवरून राज्यातील 'या' ४ अधिकाऱ्यांना नोटीस; हजर राहण्याचे आदेश

लोकसभा सचिवालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली
navneet rana
navneet ranaSaam Tv

अमरावती: खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून अमरावती पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्त, अमरावती (Amravati) यांना ६ एप्रिल दिवशी लोकसभा सचिवालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांच्या विरोधामध्ये हक्कभंग दाखल केल्यावर ही नोटीस बजावण्यात आली आहे. राज्याचे पोलीस (Police) महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह आणि अमरावतीचे तत्कालीन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

हे देखील पहा-

काय आहे नेमकं प्रकरण ?

२०२० मध्ये अमरावती जिल्ह्यात प्रचंड पावसामुळे शेतीचे (agriculture) खूप नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई आणि वीजबिल ५० टक्के माफ करावे याकरिता आमदार रवी राणांनी शेतकऱ्यांना घेऊन १३ नोव्हेंबर २०२० ला अमरावती- नागपूर महामार्ग मोझरी येथे एक नाही तर तब्बल २ तास रास्तारोको आंदोलन करण्यात आला होता. यावेळी तिवसा येथे टायरची जाळपोळ देखील करण्यात आला होता. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या आंदोलनामुळे आमदार रवी राणा यांच्यासह १८शेतकऱ्यांना तिवसा पोलीसांनी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने २० नोव्हेंबर २०२० पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यावेळी आमदार रवी राणानी दिवाळी न्यायालयीन कोठडीत काढली आहे.

navneet rana
अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग; गावकऱ्यांकडून शिक्षकाला चोप...(पहा Video)

या तक्रारींवर या ४ खासदारांच्या स्वाक्षऱ्या

१४ नोव्हेंबर २०२० दिवाळीच्या दिवशी खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेर महिलांना घेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यानंतर १५ नोव्हेंबर २०२० दिवशी हे दोघेही शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री यांच्या मातोश्रीवर जाऊन निवेदन देणार होते, पण पोलिसांनी सायंकाळी त्यांना घरूनच ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आणले होते. यावेळी खासदार नवनीत राणा चांगल्याच संतापले होते आणि त्यांनी तेव्हाच सांगितले होते की, या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना संसदेत बोलावून यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला लावणार आहे. याच प्रकरणाची तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष यांना १२ जानेवारी २०२१ ला करण्यात आली होती. त्या तक्रारींवर इतर ४ खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (ज्यामध्ये भारती पवार आणि हिना गावित) यांचा देखील समावेश आहे आणि अखेर लोकसभा सचिवालय मधून २४ फेब्रुवारी २०२२ ला उपसचिव यांनी ९ मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त, अमरावती पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग आणि तत्कालीन अमरावती पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव यांना उपस्थित राहण्याची नोटीस वाजवण्यात आली आहे. आता ६ एप्रिल दिवशी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. ज्यामध्ये आता पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना देखील हजर राहावे लागणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com