ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी पुन्हा सक्रिय
पाकिस्तान भारताविरुद्ध मोठा कट आखत असल्याचा गुप्तचर विभागाचा इशारा.
नागरिक आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यात येणार
हिवाळा सुरू होण्यापूर्वी अनेक पाकिस्तानातील गट मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया पुन्हा सुरू करतील. जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांना आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करतील. त्यांच्यावर दिल्ली आणि पुलवामा सारखा आयईडी हल्ला करतील. कार बॉम्ब स्फोट कर नागरिकांना टार्गेट केलं जाईल असा इशारा गुप्तचर यंत्रणांने माहिती दिलीय.
सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, ऑपरेशन सिंदूरनंतर पुन्हा एकदा दहशतवादी सक्रिय झालेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पीओके आणि पाकिस्तानच्या आतील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली होती. आता पुन्हा जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय दहशतवाद्यांची संख्या १३१ झालीय. आताच्या परिस्थितीत जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांमध्ये १२२ पाकिस्तानी दहशतवादी आहेत. तर ९ स्थानिक दहशतवादी आहेत. काश्मीर खोऱ्यात स्थानिक दहशतवाद्यांची संख्या तीन आहे. बहुतेक स्थानिक दहशतवादी जम्मूमधील चिनाब खोरे आणि पीर पंजाल भागात सक्रिय असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेनं दिलीय.
गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार एप्रिलमध्ये पहलगाम हल्ल्यापूर्वी मार्च २०२५ अखेरपर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये फक्त ५९ पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय होते. यापैकी २१ जण जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि २१ लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चे होते. त्यानंतर ३ जण हिज्बुल-मुजाहिदीन (एचएम) चे होते आणि १४ जण इतर गटांचे होते.
विशेष म्हणजे सतत चालू असलेलं सुरक्षा ऑपरेशन आणि झिरो टेरर धोरण राबवले जात आहे. स्थानिक दहशतवादी भरती होत नसताना सुद्धा लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद सारखे पाकिस्तानी आर्मीमधून स्पोर्टेड गुप आणि TRF, PAFF सारख्या संघटना त्यांचे प्रॉक्सी ग्रुप भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यात यशस्वी झालेत.
नाव न छापण्याच्या अटीवर बोलताना एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी OGW नेटवर्क पूर्णपणे नष्ट केलंय. सर्व स्थानिक दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. पण आता नवीन अज्ञात भरती झालीय. जे आतापर्यंत आमच्या रडारवर नव्हते. अनेक समन्वित छापे आणि अटकेनंतरही, परदेशी दहशतवाद्यांची मोठी उपस्थिती आणि त्यांचे नवीन OGW नेटवर्क अजूनही एक मोठा धोका आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.