Lashkar-e-Toiba Terrorist Killed In Pakistan 
देश विदेश

Terrorist Killed: पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा,अज्ञातांकडून गोळीबार

Lashkar-e-Toiba Terrorist Killed In Pakistan: पाकिस्तानमध्ये परत एका अज्ञात बाईकस्वारांकडून गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबारात लष्कर-ए- तोयबाचा टॉप कमांडरचा खात्मा झालाय.

Bharat Jadhav

पाकिस्तानमध्ये आखणी एका भारताच्या शत्रूला कंठस्नान घालण्यात आलंय. अज्ञात बंदुधाऱ्यांनी गोळीबार करत लष्कर-ए- तोयबाचा टॉप कमांडरचा खात्मा केलाय. पख्तूनवाच्या स्वाबी जिल्ह्यात ही घटना घडलीय. येथे एका अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार करत लष्कर-ए- तोयबाच्या कमांडरचा खात्मा केला. हत्या झालेल्या दहशतवाद्याचं नाव मोलाना काशिफ अली आहे. बाईकवर आलेल्या बंदुकधाऱ्यांनी मोलाना काशिफ अलीवर गोळीबार करत त्याची हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी काशिफ अली हा मुस्लीम तरुणांचं ब्रेनवॉश करत असायचा. तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करत असायचा. काशिफ अली हा अनेक मस्जिद आणि मदरसा यांचा प्रमुख होता. काशिफ अली पाकिस्तानच्या तरुणांचं ब्रेनवॉश करत त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश करण्यास प्रेरित करायचा.

काशिफ अली तरुणांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देखील देत असायचा. तसेच जिहाद काय आहे, याचे व्याख्यानही तो देत असायचा. काशिफ अली हा दहशतवादी संघटना लष्करच्या कव्हर पॉलिटिकल ऑर्गनायझेशन पीएमएलशीही संबंधित होता.

दहशतवादी काशिफ अलीच्या हत्येनंतर दहशतवादी संघटनेशी संबंधित अनेक संघटनांनी पाकिस्तान सरकारवर जोरदार टीका केली. यासोबतच काशिफ अलीच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणीही त्यांनी केली. या संघटनांनी काशिफ अलीच्या हत्यारांना लवकरात लवकर पकडावे, विनंती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पाकिस्तानी सरकारला केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हॉटेल स्टाईल व्हेज मंचाव सूप घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Cancer Risk : सावधान! तासंतास एका जागेवर बसल्यामुळे होऊ शकतो कॅन्सर, तज्ज्ञांनी सांगितली धक्कादायक कारणं

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT