Pakistan Balochistan Rebels Firing On Bus 
देश विदेश

Pakistan News: बलुचिस्तानात पुन्हा रक्तरंजित खेळ; बसमधून खाली ओढत बंडखोरांनी प्रवाशांना घातल्या गोळ्या

Pakistan Balochistan Rebels Firing On Bus : बंडखोरांनी बसमधील प्रवाशांवर गोळीबार केलाय. कराचीला जाणाऱ्या प्रवाशांना बसमधून बाहेर ओढत त्यांना गोळ्या घालून ठार मारले.

Bharat Jadhav

बलूचिस्तानमध्ये रक्तरंजितचा खेळ अजून सुरूच आहे. बलुच लिबरेशनने काही दिवसापूर्वी जाफर एक्सप्रेसला हायजॅक केलं होतं. हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक हल्ला झाल्याची घटना घडलीय. बंडखोरांनी बसमधील प्रवाशांवर गोळीबार केलाय. बसमधून प्रवाशांना खाली ओढत त्यांच्यावर गोळीबार केलाय. यात पाकिस्तानातील पंजाबमधील ६ जणांचा मृत्यू झालाय.

मिळालेल्या माहितीनुसार, बलूचिस्तानातील ग्वादर जिल्ह्यात गोळीबाराची घटना घडलीय. बंदूकधाऱ्यांनी रात्रीच्या वेळी कलमत भागात बसवर गोळीबार केलाय. कराचीला जाणाऱ्या बसमधील सहा प्रवाशांची हत्या केली. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी कोणात्याच गटाने स्वीकारली नाहीये. पण जातीय बलुच अतिरेकी गटांनी याआधी पंजाबमधील लोकांवर हल्ले केलेत.

दरम्यान या हल्ल्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी निषेध केलाय. संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आणि दोषींवर खटला चालवण्याचे निर्देश दिलेत. वृत्तानुसार, राष्ट्रपती आसिफ अली झरदारी म्हणाले, 'दहशतवादी देशाच्या विकासाचे आणि बलुचिस्तानच्या समृद्धीचे शत्रू आहेत.' त्यांना बलुचिस्तानमध्ये प्रगती दिसत नाहीये.

काही दिवसांपूर्वी बलुच लिबरेशनने जाफर एक्सप्रेसचं हायजॅक केलं होतं. यात बंडखोरांनी रेल्वेतील ४४० जणांना ओलीस ठेवले होते. प्रवाशांना सोडवताना पाक सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला होता. पाकिस्तानी लष्करातील सहा सैनिकांचा मृत्यू झाला होता. सैन्य कारवाई केली तर प्रवाशांना ठार करण्यात येईल, असा इशारा बलोच आर्मीने दिला होता. बलुच लिबरेशनच्या बंडखोरांनी आधी रेल्वेला बॉम्बने उडवलं होतं. त्यामुळे रेल्वे थांबली, तेव्हा बंडखोरांनी ट्रेनवर नियंत्रण घेत ४४० जणांना ओलिस ठेवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT