Security concerns rise after LeT commander Bilal Arif Salafi is killed at headquarters in Pakistan. 
देश विदेश

ईदच्या दिवशीच लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयात कमांडर बिलाल आरिफ सलाफीची हत्या, घटनेचा Video Viral

Pakistan Terrorist Bilal Arif Salafi Killed: ईदच्या दिवशी पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयात एक वरिष्ठ कमांडर, बिलाल आरिफ सलाफीची हत्या झाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या घटनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Bharat Jadhav

  • ईदच्या दिवशी LeT मुख्यालयात हत्या

  • कमांडर बिलाल आरिफ सलाफी ठार

  • मुरीदके येथे घटना घडली

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या मुख्यालयातच एका वरिष्ठ कमांडरची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याप्रमाणे 'धुरंधर' चित्रपटातील नायक पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा भागात घुसून दहशतवाद्यांना ठार मारतो, त्याचप्रमाणे लाहोरजवळील मुरीदके येथील मरकज तैयबा संकुलात ईदच्या दिवशीच नमाजानंतर बिलाल आरिफ सलाफी याची गोळी झाडून आणि चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हत्या नेमकी कोणी केली आणि कशामुळे झाले, हे अद्याप समोर आले नाहीये.

ईद नमाजानंतर हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, ईदच्या नमाजासाठी लष्कर मुख्यालयात संघटनेचे अनेक वरिष्ठ सदस्य उपस्थित होते. यामध्ये मौलाना अबू जर आणि मौलाना अब्दुल रहमान आबिद याचाही समावेश होता. नमाज संपल्यानंतर बिलाल आरिफ सलाफी प्रार्थना स्थळाबाहेर पडत असताना दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला.

बिलालला आधी गोळी मारण्यात आली. त्यानंतर चाकूने भोसकून ठार करण्यात आले. त्याच्या हत्येमुळे पाकिस्तानात लपून बसलेल्या हाफिज सईदसारख्या दहशतवादी नेत्यांमध्ये दहशत पसरली आहे. या हल्लेखोरांमध्ये महिलेचा समावेश होता. महिलेने चाकूने वार करून त्याची हत्या केली. हा हल्ला अत्यंत नियोजित होता.

प्रत्यक्षदर्शी व्हिडिओमुळे संशय वाढला

हल्ल्यानंतर इतर सदस्यांनी सलाफीला रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सलाफी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये लष्करचा प्रशिक्षण प्रमुख मौलाना अबू जर याला दुसऱ्या व्यक्तीने पकडून ठेवलेले दिसतंय.

कोण होता बिलाल आरिफ सलाफी

बिलाल आरिफ सलाफी हा लष्कर-ए-तोयबाचा एक प्रमुख कमांडर होता. जो तरुणांची भरती करणे, कट्टर विचारसरणीचा प्रसार करणे आणि त्यांना प्रशिक्षण देत होता. तरुणांना कट्टरपंथी बनवणे आणि त्यांना "काश्मीर जिहाद"साठी संघटनेत सामील करून घेणे ही त्याची प्रमुख भूमिका होती. बिलाल आरिफ सलाफी २००५ पासून लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होता. तो संघटनेसाठी निधी गोळा करण्याचे काम करत होता. या निधीचा वापर शस्त्रे खरेदी आणि दहशतवादी कारवायांसाठी केला जात असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT