Pakistan Airstrike On Afghanistan Saam Tv
देश विदेश

Pakistan Airstrike: पाकिस्तानकडून मध्यरात्री अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक, ३७ जणांचा मृत्यू

Pakistan Airstrike On Afghanistan: पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे अफगाणिस्तान हादरले.

Priya More
  • पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर मध्यरात्री हवाई हल्ला

  • अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात ३७ जणांचा मृत्यू

  • TTP तळांवर पाकिस्तानची मोठी कारवाई

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव आणखी वाढत चालला आहे. रविवारी रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ३४ जणांचा मृत्यू तर ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानने हा हल्ला अफगाणिस्तानच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करत करण्यात आला. या हल्ल्यामुळे अफगाणिस्तानला मोठा हादरला बसला.

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या तळांवर लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. कराचीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३ सैनिक ठार झाल्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानविरोधात ही कारवाई केली आहे. पाकिस्तानी तालिबानचा एक गट मानल्या जाणाऱ्या जमात-उल- अहरारने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

पाकिस्तानचे मंत्री अताउल्लाह तरार यांनी सांगितले की, पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले होत असताना अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तानने ही मोठी कारवाई केली. अफगाणिस्तानने या पाकिस्तानी हल्ल्यावर अद्याप काहीच अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतातील ज्ञान जिल्हा आणि समकान जिल्ह्यात हे हवाई हल्ले केले.

पाकिस्तानने केलेल्या या हवाई हल्ल्यामध्ये ३४ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. हे सर्व जहशतवादी नव्हते तर स्थानिक नागरिक होते असा दावा अफगाणिस्तानने केला. हा हल्ला झालेल्या ठिकाणांवर कोणतीही लष्करी ठिकाणे नव्हती, अशी माहिती आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दिली. अफगाणिस्तान सरकारने या हल्ल्याचा निषेध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT