PAKISTAN SUICIDE ATTACK: 12 SOLDIERS KILLED, TTP CLAIMS RESPONSIBILITY AFTER DEADLY BLAST Saam Tv
देश विदेश

Terror Attack : पाकिस्तानमध्ये भीषण दहशतवादी हल्ला; आत्मघातकी स्फोटात १२ सैनिकांसह १५ जण ठार

Pakistan Terror Attack : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील टँक जिल्ह्यात टीटीपीच्या आत्मघाती हल्ल्यात १२ पाकिस्तानी जवानांसह १५ जणांचा मृत्यू झाला. प्रत्युत्तरात पाकिस्तान लष्कराने १२ दहशतवादी ठार केल्याचा दावा केला आहे.

Alisha Khedekar

  • खैबर पख्तूनख्वा प्रांतातील टँक जिल्ह्यातील सुरक्षा चौकीवर हल्ला

  • या भीषण हल्ल्यात १२ पाकिस्तानी जवानांसह १५ जणांचा मृत्यू

  • तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

  • पाकिस्तान लष्कराने प्रत्युत्तरात १२ दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा

पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात झालेल्या भीषण हल्ल्यात १२ पाकिस्तानी जवानांसह एकूण १५ जणांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तान सीमेलगत असलेल्या टँक जिल्ह्यातील लष्करी आणि पोलिस सुरक्षा चौकीवर हा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई करत १२ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली आहे.

लष्कराच्या माहितीनुसार, गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्री दहशतवाद्यांनी सुरक्षा चौकीवर मोठ्या प्रमाणात हल्ला केला. सुरुवातीला त्यांनी चौकीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा दलांनी प्रतिकार केल्याने त्यांना यश आले नाही. त्यानंतर दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन चौकीच्या बाहेरील भिंतीवर आदळवले. या भीषण स्फोटात चौकीचे मोठे नुकसान झाले आणि १२ जवानांसह १५ जणांचा मृत्यू झाला.

या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. संघटनेने जारी केलेल्या पत्रकात या कारवाईत चार आत्मघाती हल्लेखोर सहभागी असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

विशेषतः अफगाणिस्तान सीमेच्या जवळचा परिसर हा दहशतवाद्यांचा असलेला भाग मानला जातो. त्यामुळे या भागात सुरक्षा दलांवर वारंवार हल्ले होत असल्याचे दिसून येत आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सीमावर्ती भागातील दहशतवाद रोखण्याचे मोठे आव्हान पाकिस्तान सरकार आणि सुरक्षा यंत्रणांसमोर उभे राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेश कमिटी बरखास्त; पक्षात खळबळ

Fact Check : मोबाइल नंबर अपडेट केला नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

SCROLL FOR NEXT