Pakistan mall fire 26 dead 81 missing 
देश विदेश

पाकिस्तानमध्ये हाहाकार! शॉपिंग मॉलमध्ये अग्नितांडव, २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ बेपत्ता

Karachi Gul Plaza shopping mall fire tragedy : पाकिस्तानच्या कराचीतील गुल प्लाझा शॉपिंग मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 81 जण बेपत्ता आहेत.

Namdeo Kumbhar

Pakistan mall fire 26 dead 81 missing : पाकिस्तानमधील कराचीमधील शॉपिंग मॉलमध्ये भयंकर आगीची घटना घडली. गुल प्लाझामध्ये अग्नितांडव झाला, या भीषण आगीत २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८१ जण बेपत्ता आहेत. तब्बल ३४ तासांच्या आटोकाट प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. बेपत्ता ८१ जणांचा शोध घेण्यात येत आहे. भीषण दुर्घटना घडलेली इमारत असुरक्षित असल्याचा रिपोर्ट स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आला आहे. २६ मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनएची पडताळणी होत आहे. दरम्यान, दुर्घटनेनंतर पाकिस्तान सरकारकडून पीडितांच्या कुटुंबियांना भरपाई जाहीर केली आहे.

कराचीमधील एम.ए. जिन्ना रोडवर असलेल्या गुल प्लाझाला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता आग संपूर्ण शॉपिंग मॉलमध्ये पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, १७ जानेवारी रोजी रात्री १० वाजता मॉलमध्ये अचानक आग लागली. आग लागली त्यावेळी मॉलमध्ये मोठ्या प्रमाणत गर्दी होती. त्यामुळे एकच गदारोळ उडाला होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला ३४ तासांचा वेळ लागला. सध्या बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

२६ मृतदेह बाहेर काढण्यात आले

भयंकर दुर्घटनेनंतर सध्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. शॉपिंग मॉलमधून आतापर्यंत २६ मृतदेह सापडल्याची माहिती डीआयजी साउथ यांनी दिली. काही जणांची ओळख पटली आहे, तर उर्वरित मृतांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटवली जाईल. या दुर्घटनेत ८१ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत १८ जणांच्या नातेवाईकांनी ओळख पटविण्यासाठी डीएनए नमुने दिले आहेत. गुल प्लाझा आणि जवळच्या रम्पा प्लाझा येथे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. दुर्घटनास्थळी बचावकार्य वेगात करण्यात येत आहे.

आगीतून वाचलेल्या झुबेर नावाच्या व्यक्तीने दुर्घटनेबाबत भयंकर अनुभव सांगितला. १० वाजल्यानंतर मॉलचे २४ दरवाजे बंद झाले होते. फक्त दोन दरवाजे खुले होते. रात्री १० वाजताच्या आसपास भयंकर आग लागली, त्यावेळी मॉलमध्ये अंधार होता. त्यात धूराचे लोट वेगात निघत होते. त्यामुळ बाहेर येण्याचा मार्ग दिसतच नव्हता, असे दुबेर यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mayor Salary: महापौरला किती पगार मिळतो? काय सुविधा मिळतात?

Prasad Oak : प्रसाद ओकनं गुपचूप उरकला लेकाचा साखरपुडा; होणारी सून आहे तरी कोण? पाहा PHOTOS

Nitin Nabin Net Worth: कोण आहेत भाजपचे नवीन अध्यक्ष नितीन नबीन? शिक्षण आणि संपत्ती किती? वाचा सविस्तर

Mayor Election : एकनाथ शिंदेंवर भाजप नेतृत्व नाराज, 'हॉटेल पॉलिटिक्स'वरून राजकारण तापले, दिल्लीकडे तक्रार

Kitchen Hacks : तांदळात किडे होतात? मग या योग्य पध्दतीने तांदुळ साठवा किडे होतील गायब

SCROLL FOR NEXT