Rescue teams inspect the damaged structure of a Shia mosque after a deadly suicide bombing in Islamabad, Pakistan. Saam Tv
देश विदेश

नमाज पठणादरम्यान मशीदमध्ये मोठा बॉम्ब स्फोट, लोकांच्या शरीराचे तुकडे-तुकडे; देशात खळबळ

Pakistan Terror Attack Shia Mosque Explosion: इस्लामाबादमधील शिया मस्जिदमध्ये नमाज सुरू असतानाच भीषण आत्मघातकी बॉम्ब स्फोट झाला. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती असून संपूर्ण पाकिस्तानमध्ये इमरजेंसी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

पाकिस्तानमध्ये नमाज पठण सुरू असताना मोठा बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. सांगितले जात आहे की हा स्फोट जुम्मानिमित्त नमाज पठाण सुरू असताना झाला. यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. इस्लामाबादच्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये असलेल्या मस्जिदमध्ये नागरिक नमाजाचे पठण सुरू होते. त्याचवेळी एक मोठा स्फोट झाला. आंतराष्ट्रीय मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, या ब्लास्टमध्ये शिया मस्जिदला टार्गेट केलेय. पण पोलिसांनी हा आत्मघातकी हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यानंतर इमरजेंसी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या राजधानीमध्ये आज भयंकर बॉम्ब स्फोट झाला. इस्लामाबादच्या शिया मस्जिदमध्ये सुसाइड बॉम्बने ब्लास्ट केला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून इमरजेंसी अलर्ट जारी केला आहे. या हल्ल्यामध्ये अनेक अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. नेमका किती जणांचा मृत्यू झाला याचा आकडा अजून समोर आला नाहीये. या भीषण बॉम्ब स्फोटचे आता व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहे. यामध्ये दिसत आहे की मस्जिदचा एक भाग पूर्णपणे ढासळला असून चारही बाजूने शरीराचे तुकडे पडले आहे.

मागच्या काही दिवसांपासून बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) चे सैनिक आधीच पाकिस्तानमध्ये हल्ला करत आहेत. मुनीरच्या सैन्याला बलुचिस्तानमधून हाकलून लावले जात आहे आणि आतापर्यंत अंदाजे १० जिल्हे ताब्यात घेण्यात आले आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफने सर्वांसमोर पराभव स्वीकारला आणि पाकिस्तान सैन्याला अपंग घोषित केले आहे. बीएलएच्या मते, पाच दिवसांत हल्ल्यात ३१० पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. तर पाकिस्तानी सैन्याचा दावा आहे की २१६ बलुच सैनिक देखील मारले गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : 'तुला चरबी आली...' कल्याणमध्ये तुफान राडा, रेल्वे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला

Chanakya Niti : भांडणांमुळे नातं ब्रेकअपपर्यंत गेलं; चाणक्यांनी सांगितलेला 'हा' छोटा बदल आताच करा, राहील सात जन्माची साथ

Liver Damage Symptoms: पायाला सारखी खाज सुटते अन् पाय चालताना दुखतात? लिव्हर खराब होण्याची ही ७ लक्षणे वाचाच

Besan Ladoo Recipe: घरीच सोप्या पद्धतीने हॉटेल स्टाईल बेसन लाडू कसे बनवायचे? वाचा खास रेसिपी

kolhapur : अंबाबाई दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा; प्रशासनाने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय!

SCROLL FOR NEXT