Pahalgam Terror Attck Saam Tv
देश विदेश

Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले या हल्ल्याशी आमचा...

Pakistan reaction on Kashmir attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने दिलं पहिलं विधान. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, हा हल्ला होम ग्रोन दहशतवाद्यांचा असून पाकिस्तानचा संबंध नाही. मोदींनी सौदी दौरा रद्द केला.

Bhagyashree Kamble

Pahalgam terror attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी घेतला. या हल्ल्यात मृतांचा आकडा २७ वर पोहोचला असून, या हल्ल्याबाबत संशयाची सुई थेट पाकिस्तानकडे वळवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी आता पाकिस्तान सरकारकडून पहिलं विधान समोर आलं आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी 'या हल्ल्याशी पाकिस्तानचा कोणताही संबंध नाही', असं म्हटलं आहे.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, ख्वाजा आसिफ म्हणाले, "या दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही. यात होम ग्रोन दहशतवादी लोकांचा समावेश आहे. तिथल्या विविध संस्थांमधील लोकांनी सरकारविरुद्ध बंड पुकारले आहे. नागालँड, मणिपूर ते काश्मीरपर्यंत लोक सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहेत. भारत सरकार नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन करत असून, त्यांचे शोषण करत आहे. त्यामुळेच जनता आता या अन्यायाविरोधात उभी राहत आहे." असं मंत्री म्हणाले.

हल्ल्यानंतरची परिस्थिती तणावपूर्ण असून सुरक्षा यंत्रणा अॅक्शनमध्ये आल्या आहेत. पहलगामच्या जंगल परिसरात राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत लष्कराच्या हेलिकॉप्टर्स, ड्रोन आणि स्निफर डॉग्जचाही वापर करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने या घटनेकडे लक्ष दिले. त्यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून तात्काळ भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. दिल्ली विमानतळावर पोहोचल्यावर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी बैठक घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaidehi Parshurami Photos: लाल साडीत खुललंं वैदेही परशुरामीचं सौंदर्य, फोटो पाहा

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप! बड्या नेत्यानं सोडली शरद पवार गटाची साथ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

SCROLL FOR NEXT