
Kolhapur tourists Kashmir News : पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. मंगळवारी सैन्याची कपडे घालून चार ते पाच दहशतवाद्यांनी एके ४७ रायफलने बेछूट गोळीबार केला. यामध्ये देशभरातून फिरायला आलेल्या २८ निष्पाप पर्यटकांचा दहशतवाद्यांने जीव घेतला. अनेतजण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यातून कोल्हापूरमधील २८ जण थोडक्यात बचावले. त्याला कारण ठरले घोडे.. होय, वेळेवर घोडे मिळाले नाहीत, त्यामुळे कोल्हापूरमधील २८ जण पहलगाममध्ये पोहचले नाहीत.
दैव बलवत्तर म्हणून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातून कोल्हापुरातील २८ पर्यटक वाचले. वेळेत घोडे न मिळाल्याने कोल्हापुरातील अनिल कुरणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पहलगामपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला, त्यावेळी कोल्हापूरमधील २८ जण फक्त दीड किमी दूर अंतरापर्यंत पोहचले. ते पहलगामकडेच निघाले होते. त्यावेळी एका ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरने हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्व २८ जण जीव मुठीत घेऊन माघारी परतले. सध्या अनिल कुरणे आणि त्यांच्यासोबतचे सहकारी जम्मू काश्मीरमध्ये सुखरूप आहेत. ते लवकरच कोल्हापूरला परतणार आहेत.
राज्य सरकार अॅक्शनमोडमध्ये
पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर काम करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे, हीच प्राथमिकता असल्याचे सांगत, अडकून पडलेल्या पर्यटकांशी समन्वय साधण्यासह त्यांना आवश्यक मदतीसाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षात विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. काश्मिरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातवाईकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.