Pakistan Gas Cylinder Price Hike SAAM TV
देश विदेश

आँsss काय सांगता? पाकिस्तानमध्ये गॅस सिलिंडर ₹ 3000 पार; नागरिकांची महागाईनं होरपळ | Pakistan Inflation

Pakistan Gas Cylinder : भारतात महागाईची झळ कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, शेजारी देश असलेल्या पाकिस्तानची महागाईनं होरपळ सुरू आहे.

Nandkumar Joshi

Pakistan Gas Cylinder Price :

भारतात महागाईची झळ कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, शेजारी देश असलेल्या पाकिस्तानची महागाईनं होरपळ सुरू आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये महागाई पाच पट अधिक आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा भाव ३००० रुपयांच्या पलीकडे पोहोचला आहे.

पाकिस्तानने 'बेलआउट पॅकेज' अंतर्गत आयएमएफ (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) च्या अटीशर्ती पूर्ण करण्यासाठी सप्टेंबरमध्ये इंधनाच्या दरांमध्ये वाढ केली होती. त्यानंतर पाकिस्तानात महागाई चार महिन्यांनंतर पहिल्यांदाच उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.

पाकिस्तानच्या सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक सप्टेंबरमध्ये गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत ३१.४४ टक्क्यांनी वाढले आहे. ब्लूमबर्ग सर्व्हेनुसार, हीच आकडेवारी ३०.९५ टक्क्यांची वाढ आणि ऑगस्टमध्ये २७.४ टक्क्यांच्या वाढीच्या सरासरी अंदाजापेक्षा खूपच जास्त आहे.

जाणकारांच्या मते, व्याजदरांनी उच्चांकी पातळी गाठल्यानंतर जूनपासून सलग तीन महिने महागाई कमी झाली होती. परंतु, या महिन्यात महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गॅस सिलिंडरच्या किंमती भडकल्या

तेल आणि गॅस नियामक प्राधिकरणाने एलपीजीच्या किंमतीत २०.८६ रुपये प्रतिकिलो वाढ केली आहे. त्यामुळे एलपीजी प्रतिकिलो २६०.९८ रुपयांवर पोहोचला आहे. घरगुती सिलिंडरच्या किंमतीतही २४६.१६ रुपये (पाकिस्तानी चलन) इतकी वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर पाकिस्तानमध्ये गॅस सिलिंडर ३,०७९.६४ रुपयांवर पोहोचला आहे.

पाकिस्तान सरकारविरुद्ध रोष

महागाईमुळं त्रस्त झालेल्या जनतेचा पाकिस्तान सरकारविरुद्ध भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये वाहतूक खर्च मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३१.२६ टक्क्यांनी वाढला आहे. खाद्यपदार्थांच्या किंमतीत ३३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर निवास, पाणी आणि विजेच्या दरांमध्ये जवळपास ३० टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT