PM Imran Khan News SAAM TV
देश विदेश

Imran Khan : माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर एके ४७ रायफलीतून गोळीबार, रॅलीत हल्ला; जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाला असून, त्यात खान जखमी झाले आहेत.

Nandkumar Joshi

Imran Khan injured : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाला. या गोळीबारात इम्रान खान जखमी झाले आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त इतर चार जणही जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे, असे वृत्त आहे. इम्रान खान यांना जखमी अवस्थेत नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी देशभरात आझादी मार्च काढला आहे. सध्याच्या सरकारविरोधात ते सातत्याने आवाज उठवत असून, रस्त्यावर उतरले आहेत. तोशखाना प्रकरणात इम्रान हे दोषी आढळले. त्यानंतर त्यांनी आझाद मार्चला सुरुवात केली. गुरुवारीही त्यांनी आझाद मार्च काढला होता. यावेळी गोळीबार झाला. त्यात इम्रान खान हे जखमी झाल्याची माहिती आहे. माजी राज्यपाल इमरान इस्मेल हे देखील या गोळीबारात जखमी झाले आहेत. (Breaking Marathi News)

रॅलीत झालेल्या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायावर गोळी लागली आहे. तहरीक ए इन्साफचे अन्य नेतेही या गोळीबारात जखमी झाले आहेत. फवाद चौधरी यांच्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्यावर एके ४७ रायफलीने गोळीबार केला आहे. त्यांच्या पायावर गोळी लागली असून, नजीकच्या रुग्णालयात त्यांना तात्काळ दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur News: वडिलांच्या मोबाइलवर मुलगा खेळायचा फ्री फायर गेम, बँक खात्यातून ५ लाख गायब | VIDEO

श्रावणात ३ ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल

Ashok Saraf Age: अशोक सराफ यांचे खरं वय किती?

Nitanshi Goel: 'लापता लेडीज'मधील 'फूल'चा ऑफ-शोल्डर गाऊन लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

SCROLL FOR NEXT