Joe Biden : पाकिस्तान जगातील सर्वात खतरनाक देश; जो बायडेन असं का म्हणाले?

पाकिस्तान हा जगातील सर्वात खतरनाक देश आहे, असं मोठं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलं आहे. पा
America President Joe Biden
America President Joe BidenSaam TV
Published On

मुंबई : पाकिस्तान हा जगातील सर्वात खतरनाक देश आहे, असं मोठं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलं आहे. पाकिस्तान हा सर्वात खतरनाक देशांपैकी एक आहे, असं म्हणत बायडेन त्यांनी पाकिस्तानचा नापाक चेहरा जगासमोर उघड केला आहे. जो बायडेन यांच्या या वक्तव्याने पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. (Latest Marathi News)

America President Joe Biden
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा! बोगस शपथपत्राप्रकरणी गुन्हे शाखेने केला महत्वाचा खुलासा

बायडेन यांनी एका पत्रकारपरिषदेत बोलताना ही पोलखोल केली आहे. 'पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत, मात्र तिथल्या सैन्यात आणि लोकनियुक्त सरकारमध्ये ताळमेळ नाही. यामुळेच पाकिस्तान हा खतरनाक देश असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तानातील या परिस्थितीमुळे तो जगासाठी धोकादायक बनला', असं बायडेन यांनी म्हटलं आहे. (Maharashtra News)

अमेरिकेकडून पाकिस्तानला मदत?

एकीकडे पाकिस्तानला खतरनाक म्हणणाऱ्या अमेरिकेने हिंदुस्थानच्या या शेजारी राष्ट्राबाबात दुटप्पी भूमिका अवलंबली आहे. अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची मदत देणे तसेच आर्थिक रसद पुरवणे सुरूच ठेवले आहे. 8 सप्टेंबर रोजी अमेरिकेने F-16 लढाऊ विमानाच्या देखभालीसाठी पाकिस्तानला 450 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 3,581 करोड रुपये मंजूर केले होते.

गेल्या चार वर्षांत इस्लामाबादला दिलेली ही सर्वात मोठी सुरक्षा मदत होती. असे असतानाही पाकिस्तानला सर्वात धोकादायक देश असे वर्णन करणारे बायडेन यांचे वक्तव्य समोर आले आहे. दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिका-पाकिस्तान संबंधांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. इस्लामाबादचे वॉशिंग्टनशी असलेले संबंध अमेरिकेच्या हिताचे नाहीत, असे ते म्हणाले.

'अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांचा कधीही पाकिस्तान आणि अमेरिकेला फायदा झाला नाही. आता पाकिस्तानशी संबंध कायम ठेवून अमेरिकेला काय मिळत आहे, याचे चिंतन अमेरिकेने केले पाहिजे. आगामी काळात दोन्ही देशांमधील संबंध कितपत मजबूत आणि फायदेशीर ठरू शकतात, याचा विचार व्हायला हवा', असंही जयशंकर यांनी म्हटलं होतं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com