Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा! बोगस शपथपत्राप्रकरणी गुन्हे शाखेने केला महत्वाचा खुलासा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. बोगस शपथपत्राप्रकरणी गुन्हे शाखेने मोठा खुलासा केलाय.
Shivsena Uddhav thackeray
Shivsena Uddhav thackeraySaam TV
Published On

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. बोगस शपथपत्राप्रकरणी गुन्हे शाखेने मोठा खुलासा केलाय. ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) दिलेली शपथपत्र बोगस नसल्याचं गुन्हे शाखेनं म्हटलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारी अनेक शपथपत्र बनावट असल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता. (Shivsena News Today)

Shivsena Uddhav thackeray
सर्वात मोठी बातमी! शिंदे गटाच्या ढाल-तलवार चिन्हावर शीख समाजाचा आक्षेप

याप्रकरणी मुंबईच्या निर्मलनगर पोलीस ठाण्यात या बनावट शपथपत्र प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक कोल्हापूरसह नाशिक, पालघर, अहमदनगरमध्ये दाखल झाले होते. या सर्व चौकशीत ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमधील २०० शपथपत्रांवर आक्षेप घेण्यात आला होता. निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्राईम ब्रँचकडे वर्ग झाल्यानंतर दोन अधिकाऱ्यांचे पथक कोपरगावमध्ये दाखल झाले. त्या अनुषंगाने २०० जणांची क्राइम ब्रँचने तीन दिवस चौकशी करून शहानिशा केली. (Maharashtra News)

Shivsena Uddhav thackeray
Weather Update : परतीचा पाऊस कधी थांबणार? हवामान खात्याने सांगितली तारीख

या चौकशीत असता शपथपत्रांसंदर्भात काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आलंय. 'गेले तीन दिवस आम्ही ज्या कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहेत. त्या प्रत्येकाला समक्ष बोलवून त्यांची विचारपूस केली होती. त्यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे की नाही याची खात्री केली. त्यावेळी सर्वांनीच ते शपथपत्र दिलं आहे असं आमच्या जबाबात सांगितलं आहे', असं गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com