Weather Update : परतीचा पाऊस कधी थांबणार? हवामान खात्याने सांगितली तारीख

सध्या राज्यात परतीच्या पावसानं (Rain) चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
Weather Update
Weather UpdateSaam Tv
Published On

Weather Update : सध्या राज्यात परतीच्या पावसानं (Rain) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात हा पाऊस कोसळत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना देखील बसला आहे. काढणीला आलेली सोयाबीन पिकाची पावसामुळे नासधूस झालीय. यामुळे पाऊस कधी थांबणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. (Maharashtra Rain News Today)

Weather Update
Breaking News : उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारला भीषण अपघात; २ पोलिसांसह ६ जण जखमी

परतीचा पाऊस राज्यातून 20 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पूर्णपणे माघार घेऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात शनिवारपासून पावसाचा जोर कमी होईल. तर दिवाळीदरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकेल. असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. (Latest Marathi News)

गेल्या तीन ते चार दिवसात परतीच्या पावसानं पुण्यासह महाराष्ट्राला झोडपलं आहे. या पावसामुळं औरंगाबाद, नाशिक, परभणी, जालना, बीडमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्याचबरोबर राज्यातील सिंधुदुर्ग, पुणे, परभणी, लातूर, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार बॅटींग केली आहे. (Maharashtra News)

Weather Update
Latur Crime News : अनैतिक संबंधात पतीचा अडथळा; पत्नीचं कृत्य पाहून पोलीसही हादरले

पुण्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

पुण्यातही परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी दुपारनंतर पुण्यात झालेल्या पावसानं पुणेकरांची चांगलीच तारंबळ उडवली. दीड ते दोन तास सुरु असलेल्या पावसानं सगळीकडं पाणीच पाणी साचलं आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं.

पुण्यात दोन दिवस यलो अलर्ट

दरम्यान, पुणे जिल्ह्याला दोन दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहील, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे दिवेघाटात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. रस्त्यांवर अक्षरशः पाण्याचे लोट वाहताना दिसत होते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com