Latur Crime News : अनैतिक संबंधात पतीचा अडथळा; पत्नीचं कृत्य पाहून पोलीसही हादरले

पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळला. त्यानंतर कमरेला दगड बांधून पतीला पाण्यात फेकून दिलं.
Latur Crime News
Latur Crime NewsSaam TV

Latur Crime News : अनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच खून केल्याची घटना लातूर (Latur) जिल्ह्यात घडली. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळला. त्यानंतर कमरेला दगड बांधून पतीला पाण्यात फेकून दिलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील घडली आहे. (Latur News Today)

Latur Crime News
MSRTC News : सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी; ऐन दिवाळीत एसटीचा प्रवास महागणार

नेमकं काय घडलं?

दोन-तीन दिवसांपूर्वी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कॅनॉलमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपास केला असता, हा मृतदेह देवणी तालुक्यातील बालाजीवाडी येथील रहिवाशी असल्याचे समोर आलं आहे. अरविंद पिटले असं मृत व्यक्तीचं नाव होतं. अरविंद हे त्यांच्या पत्नीसह लातूर शहरातील ठाकरे चौकात वास्तव्यास होते.

ऐकेदिवशी अचानक अरविंद हे बेपत्ता झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह कॅनॉलमध्ये आढळून आला. अरविंद हे बेपत्ता असूनही पत्नीने पोलिसांत तक्रार केली नव्हती. त्यामुळे पोलिसांना अरविंदच्या पत्नीवर संशय आला. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, आपणच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला असल्याची कबूली तिने दिली. (Maharashtra News)

पत्नीचे होते अनैतिक संबध

मृत अरविंदच्या पत्नीने घरणी येथे राहणाऱ्या सुभाष शिंदे नामक व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. त्यांच्या संबधास अरविंद हा अडसर ठरत होता. त्यामुळे दोघांनी मिळून अरविंदचा काटा काढायचं ठरवलं. पत्नीने जेवायच्या निमित्ताने अरविंदला एका धाब्यावर नेलं. तिथे उपस्थित असलेल्या प्रियकर सुभाषच्या मदतीने तिने अरविंदचा गळा आवळला.

त्यानंतर एका पिशवीत दगड भरून ती मयताच्या कमरेला बांधून कॅनॉलच्या पाण्यात टाकला. या घाईगडबडीत मयत अरविंदचा मोबाईल त्याच्या खिशातच राहिला. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे सोपे झाले. दरम्यान लातूर ग्रामीण पोलिसांनी मयताची पत्नी आणि तिचा प्रियकर सुभाष शिंदे यांना अटक केली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com