MSRTC News : आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक धक्का देणारी बातमी आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (Msrct) हंगामी भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खिसा रिकामा होणार आहे. (Latest Marathi News)
पेट्रोल-डिझेलनंतर सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने प्रवास खर्च महागला आहे. त्यामुळे दिवाळीच्या दहा दिवसांमध्ये १० टक्के हंगामी तत्त्वावर भाडे वाढवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. एकीकडे या काळात खासगी वाहतूक अव्वाच्या-सव्वा दरात केली जात असताना आता एसटी प्रवासही खिशाला झळ देऊन जाणार आहे. (Maharashtra News)
तिकीट दरवाढ २० ऑक्टोबर मध्यरात्रीपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. एसटीने ५ ते ७४ रुपयांपर्यंतची दरवाढ केली असून दादर-स्वारगेट मार्गावर सध्या २२५ रुपये दर आहे तो या काळात २६० रुपये असणार आहे. तर शिवशाही गाडीसाठी ३५० असलेल्या दरात ३८५ रुपये इतकी वाढ केली जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, अतिरिक्त भाडेवाढ शिवनेरी आणि अश्वमेध या बस सेवेला लागू नसेल, असे देखील महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत एसटी जादा भाडे आकारून दिवाळं काढणार असल्याची भावना जनमानसातून व्यक्त केली जात आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.