Pakistan Former PM Imran Khan Saam Digital
देश विदेश

Pakistan Former PM Imran Khan: इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, निवडणूक चिन्हही जाणार?

Sandeep Gawade

Pakistan Former PM Imran Khan

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी क्रिकेटर इम्रान खान याच्या पक्षाला बॅट हे चिन्ह देण्यास निवडणूक आयोगाने विलंब धोरण अवलंबल आहे. निवडणूक आयोगाची ही भूमिका म्हणजे निवडणुकीपूर्वीची हेराफेरी असल्याचा आरोप पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) केला असून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने पीटीआय पक्षाच्या अध्यक्षांची निवडच फसवी असल्याचे म्हटल्यामुळे त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह धोक्यात येण्याची शक्यता आहे.

पक्षाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी निवडण्यासाठी पाकिस्तानच्या निवडूक आयोगाने अंतर्गत निवडणुकांचे आदेश दिल्यानंतर इम्रान खान याच्या पक्षाने २ डिसेंबर रोजी निवडणुका घेतल्या. ज्यामुळे पीटीआयचे बॅट हे निवडणूक चिन्ह म्हणून कायम ठेवता येईल. याच दिवशी इम्रान खान यांचे उमेदवार बॅरिस्टर गौहर खान यांना पक्षाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. मात्र याविरोधात याचिका दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगाने ही निवड फसवी अल्याचे म्हटले आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या पक्षाचं चिन्हही धोक्यात आलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इम्रान खान यांच्या पक्षाने पीटीआयने निवडणूक आयोग्याच्या या निर्णयाचा समाचार घेतला आहे. पाकिस्तानमधील सध्याची सरकारे असंविधानीक असल्याची टीका केली आहे. इम्रान खान यांना संपवण्यासाठी आणि त्यांच्या समर्थकांवर दबाव आणण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. सतत अशा प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा पीटीआयने केला आहे. पीटीआयचे चेअरमन गौहर खान यांनी निवडणूक आयोगाकडे बिलंब न करता पक्षाचे निवडणूक पत्र जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही घटनात्मक लोकशाहीत मुक्त आणि मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचा सहभाग असतो आणि पक्षाचे चिन्ह हे त्या प्रक्रियेचे प्रतिक असते, असे त्यांनी म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT