बागेश्वर धामचे प्रमुख धिरेंद्र शास्त्री यांना ईमेलवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशमच्या छतरपूर पोलिसांनी अटक केली आहे. बिहारची राजधानी पटना येथून त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्याने धमकीची कबुली दिली असून लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याने ३० ऑक्टोबरमध्ये बागेश्वर बाबांकडे १० लाखांच्या खंडणीची मागणी केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धिरेंद्र शास्त्री यांना धमकी देणारा आरोपी बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील शंकरडीह भागातील आहे. त्याने ३० ऑक्टोबर रोजी बागेश्वर धामच्या ईमेल आयडीवर बनावट ईमेल आयडीवरून धमकीचा संदेश पाठवला होता. त्यानंतर पोलीस आणि तपास यंत्रणांची तारांबळ उडाली होती. त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी पुन्हा त्याच ईमले आयडीवरून आणखी एक धमकीचा ईमेल आला होता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर इंटरपोलच्या मदतीने आरोपीचा पोलिसांनी शोध सुरू केला होता. तपासासाठी छतरपूरेच पोलीस अधीक्षक अमित सांघी यांच्या नेतृत्त्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आलं होतं. पथकात अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रम सिंह, एसडीओपी खजुराहो सलील शर्मा, पोलीस स्टेशन प्रभारी बमिथा, इन्स्पेक्टर जयवंत काकोडिया, संजय पांडे यांच्यासह सायबर सेलच्या प्रमुखांचा समावेश होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.